Cow Dung Tractor : गाईच्या शेणावरही चालेल ट्रॅक्टर

गाईच्या शेणाचा उपयोग ट्रॅक्टर मध्ये इंधन म्हणून वापर होताना तुम्ही कधी पाहिला नसेल. ब्रीटनमधील बेनामन कंपनीनं गाईच्या शेणातील मिथेन वायुवर चालणारं ट्रॅक्टर बनवलयं.
Cow Dung Tractor
Cow Dung TractorAgrowon

विविध अधुनीक यंत्रामुळे भारतीय शेतीत ट्रॅक्टरचा उपयोग वाढलाय. मशागतीपासून पिकाच्या काढणीपर्यंत शेतात ट्रॅक्टरचा (Tractor) वापर केला जातो.

ट्रॅक्टर चालविण्यासाठी डीझेल गरजेचं असतं. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) कंमतरतेमुळं पेट्रोल, डीझेलच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत हे आपल्याला माहीतचं आहे.

त्यामुळं ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी खर्चिक बाब बनत आहे. यावर उपाय म्हणून ब्रिटीश कंपनी बेनामनने (Benaman) शेणावर चालणारा ट्रॅक्टर बनवलाय.

हा ट्रॅक्टर चालवण्यासाठी डीझेल नाही तर चक्क गाईचं शेण (Cow Dung) वापरलयं.

Cow Dung Tractor
Tractor: ट्रॅक्टर विक्रीमध्ये होतेय वाढ

विविध गुणधर्मामुळं भारतीय संस्कृतीत गाईच्या शेणाला अनन्यसाधारण महत्व आहे हे वेगळ सांगायची गरज नाही.

गाईच्या शेणापासून खत, रंग याशिवाय ग्रामीण भागात इंधन म्हणून शेणाच्या गोवऱ्या तयार केल्या जातात.

पण गाईच्या शेणाचा उपयोग ट्रॅक्टर मध्ये इंधन म्हणून वापर होताना तुम्ही कधी पाहिला नसेल. ब्रीटनमधील बेनामन कंपनीनं गाईच्या शेणातील मिथेन वायुवर चालणारं ट्रॅक्टर बनवलयं.

हे ट्रॅक्टर २७० हॉर्स पॉवरच असून डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर प्रमाणेच तकदवान आहे. या ट्रॅक्टरमुळ प्रदुषणही कमी होतं.

त्यामुळे पर्यावरणासाठीही हे ट्रॅक्टर फायदेशीर आहे. विशेष म्हणजे डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत हे ट्रॅक्टर चालवण्याचा खर्चही कमी आहे.

Cow Dung Tractor
Tractor Market : कोणत्या ट्रॅक्टरची मागणी वाढली ?

ट्रॅक्टर चालविण्यासाठी बायोमिथेन वायुची निर्मिती

बेनामन कंपनी एका दशकाहून अधिक काळ बायोमिथेन उत्पादनावर संशोधन करत आहे.

बायोमिथेन तयार करण्यालाठी कंपनीने १०० गायी असलेल्या गोठ्यामध्ये बायोमिथेन उत्पादनासाठी युनिट तयार केलयं.

या युनिटमध्ये गाईचे शेण व मूत्र गोळा करुन त्यातून बायोमिथेनची निर्मिती होते.

हे द्रवरुप बायोमिथेन -१६० अंश तापमानावर क्रायोजेनिक टाक्यांमध्ये भरून ही टाकी ट्रॅक्टरवर बसवण्यात आली. मिथेन वायुमुळे ट्रॅक्टरला डिझेल प्रमाणेच ड्रायव्हिंग पॉवर मिळते.

या ट्रॅक्टरच्या एक वर्ष चाचण्या घेण्यात आल्या. या ट्रॅक्टरमुळं एका वर्षात कार्बन डायऑक्साइडच उत्सर्जन २,५०० मेट्रिक टनांवरून ५०० मेट्रिक टनांपर्यंत कमी झाल्याचं दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील कॉर्नवॉल काउंटीमध्ये घेतलेल्या चाचण्यांवरुन दिसून आलयं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com