Chandrapur News : शेतकरी आणि जनसामान्यांच्या हक्कांसाठी काँग्रेसच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, यासह सरकारविरोधातील घोषणांनी परिसर दणाणला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला..भवानी माता मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घ्यावे, बोगस मतदार नोंदणीप्रकरणी कारवाई करावी, खतांचा कृत्रिम तुटवडा दूर करावा, कापूस व सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज, कृषिपंपांना नियमित वीजपुरवठा, .अतिक्रमणधारकांना पट्टे देणे, तरुणांना स्थानिक उद्योगात रोजगार, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ पेन्शन वाढवणे, महिला बचतगटांना व्याजमाफी, रस्ते व जलजीवन मिशनची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करणे यासह सुमारे २७ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. शासनाने या मागण्या तातडीने मान्य न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला..Farmer Loan Waiver: संपूर्ण कर्जमाफी, ५० हजार एकरी मदतीसाठी शेतकरी आणि शेतमजूरांचे राज्यभर आंदोलन.आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, देविदास सातपुते, सूरज ठाकरे, सभापती विकास देवाळकर, नानाजी आदे, नंदकिशोर वाढई, प्रभाकर येरणे, हरजितसिंग संधु, गजानन भटारकर, विलास तुमाने, संतोष गटलेवार, बापू धोटे, सुरेश पावडे, विनोद झाडे, राजु झाडे, सचिन भोयर, शैलेश लोखंडे, विवेक येरणे, निर्मला कुडमेथे, संध्या चांदेकर, कुंदा जेनेकर, एजाज अहमद, अॅड. राम देवईकर, तिरुपती इंदूरवार, कोमल फुसाटे, अब्दुल जमीर, धनराज चिंचोलकर, युसूफ भाई, राम धुमणे, मंगेश गुरनुले, चेतन जयपूरकर, पुनम गिरसावळे, इंदू निकोडे यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते..Farmer Loan Waiver: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आठवलेंचे सूचक वक्तव्य, राज्य सरकारला दिला 'हा' सल्ला .अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा...राजुरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खुलेआम वाळूची अवैध चोरी सुरू आहे. जेसीबी, ट्रॅक्टरने वाळूचा उपसा सुरू आहे. याला राजकीय पाठबळ लाभले आले. वाळू चोरांना पाठिशी घालण्याचे काम महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस यंत्रणा करीत असल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला. वाळू चोरांच्या मुसक्या आवळल्या नाही, तर पुढील मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांना देण्यात आला..केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. मतांची चोरी करून सत्तेत आलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ लूट आणि दिशाभूल करत आहे.- प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर.शेतकरी कर्जाच्या खाईत लोटलेला आहे. निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.- सुभाष धोटे, माजी आमदार, राजुरा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.