Anil Ghanwat Agrowon
ताज्या बातम्या

Lockdown : देशात पुन्हा लॉकडाऊन करू नये ः घनवट

चीनसह इतर काही देशांमध्ये कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धसका घेत भारतात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसते. लोकडाऊनमुळे आरोग्याला व अर्थव्यवस्थेला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते.

टीम ॲग्रोवन

नगर : ‘‘चीनसह इतर काही देशांमध्ये कोविडच्या (Covid Outbreak) वाढत्या प्रादुर्भावाचा धसका घेत भारतात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) करण्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसते. लोकडाऊनमुळे आरोग्याला व अर्थव्यवस्थेला (Economy) फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. त्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाऊन घोषित करू नये. तसे केल्यास स्वतंत्र भारत पक्ष लोकडाऊन न पाळण्याचे आंदोलन जाहीर करेल,’’ असा इशारा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला.

घनवट म्हणाले, ‘‘कोरोनाचा नवीन व्हेरियंट जगभर झपाट्याने पसरतो आहे. मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत, असा खोटा प्रचार माध्यमांत जोर धरत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती आणि लोकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील लोकडाऊनमध्ये देशाचे मोठे नुकसान झाले. जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. कामगारांना हजारो किलोमीटर पायी चालत जावे लागले. व्यापार, कारखानदारी ठप्प झाली. अनेकजण कर्जत बुडाले. आता कुठे उद्योग सुरळीत होऊ पाहत आहेत. अशात पुन्हा लॉकडाऊन लावल्यास जनतेचे प्रचंड हाल व देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येईल.’’

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार, ज्या देशांमध्ये कडक लॉकडाऊन पाळले गेले, तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाले. लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाले, असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

ज्या देशांनी लॉकडाऊन पाळले नाहीत, त्यातील स्वीडनमध्ये कोविड काळात मृत्युदर, लोकडाऊन करणाऱ्या देशांपेक्षा कमी आहे. कोविड महामारी, स्पॅनिश फ्लूपेक्षा ५० ते ५०० पटीने कमी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे,’’ असेही घनवट म्हणाले. ‘‘स्वतंत्र भारत पक्षाने पहिल्या पासूनच सक्तीच्या लॉकडाऊनला विरोध केला आहे. सरकारने पुन्हा आशा निरुपयोगी, त्रासदायक व नुकसानकारक लोकडाऊनची घोषणा केली तर त्याला जाहीर विरोध करून सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे जनतेला आवाहन करण्यात येईल,’’ असा इशारा घनवट यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT