Palghar News : विक्रमगड : तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीमधील पेसा गाव वैतागवाडी येथे रानभाजी कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे यावर भर देण्यात आला. .विक्रमगडच्या निसर्गसंपन्न आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या रानभाज्या हा इथल्या लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांना या भाज्यांचे पारंपरिक ज्ञान आणि त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती देण्यात आली. .Wild Vegetable Festival : रानभाजी महोत्सवाला उदंड प्रतिसाद.यात विविध प्रकारच्या रानभाज्या जसे की, कवळा, टाकळा, कुरडू, शेवग्याची पाने, अंबाडी, बाफळी, लोत, माठ, टेटू, खरशेंग यांसारख्या एकूण २६ रानभाज्यांचा समावेश होता..Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे हर्जितजी शिंग, दीपक पवार, संदिप पाटील, कविता पाटील, राजेंद्रजी मोरे, जव्हारचे सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉ. अनिता पाटील, धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मधुकर मालकरी, साखरे वनपाल हेमंत शिंदे, वनरक्षक खुडेद प्रदीप भंडारी, साखरे तलाठी सुरज जाधव, सातकोर तलाठी महेश भोये, खुडेद गावचे सरपंच लहू नडगे, अंगणवाडी सेविका, तसेच शाळेतील लहान मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला देण्यात आला..ताज्या रानभाज्यांचे प्रदर्शनकार्यक्रमात सहभागी झालेल्या नऊ महिलांनी स्वतःच्या शेतातून आणलेल्या ताज्या रानभाज्यांचे प्रदर्शन केले. या भाज्यांपासून बनवलेले विविध पदार्थही उपस्थितांना चाखायला मिळाले. स्थानिक महिलानी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन रानभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स लावले होते, ज्यामुळे त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.