Latur/Dharashiv News : अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकरी व पशुपालकांना शासनाकडून मदत मिळणार आहे.व एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी हमी परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांना दिली..धाराशिव तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर) येथे सोमवारी (ता. १६) नुकसानग्रस्त शेत पिकांची पाहणी भर पावसात पाहणी केल्यानंतर ते शेतकऱ्यांसोबत बोलत होते. वडगाव येथील शेतकरी भुजंग जानराव यांच्या दोन एकर सोयाबीन पिकांची पाहणी सरनाईक यांनी केली व जानराव यांची व्यथा त्यांच्या बांधावर जात जाणून घेतली. .Rain Crop Damage : अमरावती जिल्ह्यात ५१ हजार हेक्टरवरील पिके नष्ट.यावेळी गजेंद्र जाधव यांनीही परिसरातील पिकांच्या नुकसानीची माहिती सरनाईक यांना दिली. जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महादेव आसलकर, तलाठी माधव कदम, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत..लातूरला पावसाचे थैमान, चौघे वाहून गेलेजिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाचे थैमान सुरुच आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसात जळकोट तालुक्यातील पाटोदा ते माळहिप्परगा रस्त्यावरील नाल्यावरून जाताना ऑटोरिक्षा प्रवाहात वाहून गेली. याच रिक्षातील चार प्रवासी वाहून गेले असून बचाव पथकाने त्यातील विठ्ठल धोंडीबा माळी (वय ५६) यांना शोध घेत सुरक्षित बाहेर काढले आहे. .Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी.ऑटोरिक्षाचालकासह वैभव पुंडलिक गायकवाड (वय २४) व संगीता मुहारी सूर्यवंशी (वय ३२) या तिघांचा अद्याप शोध सुरु आहे. रात्री उशिरा नांदेडहून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून पथकाने शोध कार्य सुरु केले आहे. दरम्यान तिरुका येथील मासेमारीसाठी गेलेले सुदर्शन केरबा घोणशेट्टी तिरु नदीत वाहून गेले वीज पडून तीन म्हशींचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. .उंबडगा (ता. निलंगा) येथील घरात पुराचे पाणी घुसल्याने आठ कुटुंबातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. या स्थितीत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही भागात उसाचे पीकही आडवे झाले आहे. सततच्या पावसाने पिके काळी पडली असून अजून पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.