Beed APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Beed APMC : बीड बाजार समितीला प्रथमच महिला सभापती

APMC Election : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 50 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेला सभापतिपदाचा मान मिळाला.

Team Agrowon

Beed News : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 50 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेला सभापतिपदाचा मान मिळाला. सरला मुळे सभापती तर श्याम पडुळे यांची उपसभापतिपदी शुक्रवारी (ता. 12) बिनविरोध निवड झाली.

बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), भाजप, शिवसेना, काँग्रेस, शिवसंग्राम, शेकाप, सावता परिषद, संभाजी ब्रिगेड आदीं एकत्र आले.

त्यांनी परिवर्तन महाआघाडी करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा पराभव करून 50 वर्षानंतर बाजार समितीमध्ये सत्तांतर केले.

18 पैकी संचालक बळिराम चव्हाण, प्रभाकर जोगदंड, शरद झोडगे, उद्धव पैठणे, संजय माने, आदिनाथ लांडे, ज्ञानेश्वरी काळकुटे, सुभद्रा माने, विश्वास आखाडे, नितीन फड, धनंजय गुंदेकर, दीपक काळे, गणेश उगले आदी 15 संचालक विजयी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT