Pune APMC Result : जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) सभापतिपदी दिलीप काळभोर (Dilip Kalbhor) यांची, तर उपसभापतिपदी लोणी कंद येथील रवींद्र कंद यांची मंगळवारी (ता. ९) बिनविरोध निवड झाली. काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतिपदी निवड झाली आहे. तर कंद हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी हवेली बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. सभापतिपदासाठी काळभोर यांचा तर उपसभापतिपदासाठी कंद यांचे उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी त्यांची निवड झाल्याची घोषणा केली.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली होती. भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद व जिल्हा बॅंकेचे संचालक विकास दांगट यांच्या नेतृत्वाखालील ‘अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी’ने १३ जागा जिंकल्या होत्या.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल’ला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले. तर व्यापारी व हमाल-मापाडी गटातून तीन उमेदवार स्वतंत्र निवडून आले होते.
मिरवणुकीसह गुलालाची उधळण
दरम्यान, सभापती व उपसभापतिपदाच्या निवडी जाहीर होताच भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते प्रदीप कंद व ‘पीडीसीसी’चे संचालक विकास दांगट, बाजार समितीचे वरिष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप काळभोर यांचे अभिनंदन केले.
या वेळी मार्केट यार्ड आवारात गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तसेच बाजार परिसरातून सर्व संचालकांची मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.