Drought Impact on Farming: पुरंदर तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पूर्ण केलेल्या पंचनाम्यानुसार, तालुक्यातील ४० हजार ०८९ शेतकऱ्यांच्या २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाची झळ बसली आहे. नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडून ३४ कोटी ८५ लाख ५०० रुपयांचा निधी अपेक्षित आहे..शासनाच्या आदेशानुसार महसूल विभाग, पंचायत समिती आणि कृषी विभागाने संयुक्तपणे नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिली. या वर्षी खरीप हंगामात तालुक्यात एकूण ३३ हजार २११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मात्र, पावसाने ओढ दिल्याने त्यापैकी मोठ्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे..Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश .यामध्ये प्रामुख्याने जिरायती भागातील भात, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, वाटाणा तर बागायती क्षेत्रातील ऊस आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, एकीकडे पिके पाण्याअभावी जळत असताना तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी ७० ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना मोठा फटका बसला..दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन वेबिनारद्वारे जनजागृती केली जात आहे. यामध्ये मका व चारा पिकांच्या व्यवस्थापनावर भर दिला जात आहे..Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश .शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून मदतराष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उप अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील १५,८६० शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे मिनी कीट दिले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक शेतकऱ्याला ४ किलोप्रमाणे एकूण ६३४.४० क्विंटल बियाणे वितरित केले जाईल..पीकनिहाय नुकसानीची आकडेवारीजिरायती पिके (भात, बाजरी, सोयाबीन) : ८,१२६ हेक्टर (१४,१८६ शेतकरी)बागायती पिके (ऊस, भाजीपाला) : १२,८४१ हेक्टर (२३,३५६ शेतकरी)फळपिके (सीताफळ, डाळिंब, आंबा) : २,७१७ हेक्टर (५,५४७ शेतकरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.