Snail Control  Agrowon
ताज्या बातम्या

Snail Control : गोगलगायीसाठी प्रतिबंधाबाबत उपाय करा

Crop Damage By Snail : आधीच कमी पावसाचे संकट आहे आणि त्यात पुन्हा सोयाबीनवर गोगलगायीच्या प्रादुर्भावाने अडचण झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : आधीच कमी पावसाचे संकट आहे आणि त्यात पुन्हा सोयाबीनवर गोगलगायीच्या प्रादुर्भावाने अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच गोगलगायीच्या प्रतिबंधासाठी कृषी विभाग आणि शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले खामगाव (ता.बार्शी) येथे केले.

कृषी विभागाने गोगलगायीच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने खामगाव येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात श्री. कोयले बोलत होते. गोगलगाय नियंत्रण आणि उपाययोजना या विषयावर यावेळी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पक चाटी, कृषी पर्यवेक्षक सुधीर काशीद, सरपंच माळी, युवराज काटे, गोकुळदास जाधव, पोलिस पाटील तळेकर आदी उपस्थित होते.

श्री. कोयले म्हणाले की, शेताचे बांध स्वच्छ करणे, गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी बांधाच्या कडेने चुना अथवा राखेचा दहा सेंटिमीटरचा पट्टा पसरावा. सकाळी लवकर एकत्रितपणे गोगलगायींना पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी गवताचे ढीग व गुळाच्या पाण्यात भिजवलेले गोणपाट यांचा वापर करावा. गवताचे ढीग वा गोणपाटाखाली जमा झालेल्या गोगलगायी दहा टक्के मिठाच्या द्रावणाच्या वापरातून नियंत्रणात आणाव्यात.

त्या गोळा करताना हातमोज्यांचा वापर करावा. रासायनिक नियंत्रणासाठी मेटाल्डीहाइड या दाणेदार आमिषरूपी कीडनाशकाचा वापर कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार करावा. फळबागांमध्ये झाडाच्या खोडास दहा टक्के बोर्डो पेस्ट लावल्यास गोगलगायीला झाडावर चढण्यापासून रोखता येते असेही ते म्हणाले. आत्माअंतर्गत विविध योजनांची माहिती तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चाटी यांनी दिली.

केवड्यालाही रोखा

सोयाबीन हे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे. गोगलगायीबरोबर सोयाबीन पिकावरील पिवळ्या मोझॅकचा (केवडा) प्रसार रोखण्यासाठी पांढरी माशीचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे.

त्यासाठी एकरी वीस या प्रमाणात पिवळे चिकट सापळे लावावेत. तसेच रासायनिक कीड नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (२५ टक्के) दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी, असेही कृषी अधिकारी कोयले म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT