Nashik News: जगातील अति दुर्मीळ श्रेणीत मोडणारी ‘पोरपॅक्स जर्डोनियाना’ या ‘ऑर्किडेसी’ कुळातील प्रजातीची नाशिकमध्ये नोंद झाली आहे. या वनस्पतीचा शोध नाशिकच्या वैतरणा धरण परिसरातील ढोऱ्या डोंगरावर लागला आहे. यापूर्वी नाशिकमध्ये आढळणाऱ्या दुर्मीळ वनस्पतीमध्ये तिची नोंद नव्हती. नाशिकच्या ‘केटीएचएम’ महाविद्यालयाच्या संशोधकांची ही कामगिरी केली आहे. .‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉझर्व्हेशन ऑफ नेचर’ या संस्थेच्या अधिसूचीनुसार ही वनस्पती ‘असुरक्षित’ यादीत समाविष्ट केलेली आहे. म्हणजेच तिचे संवर्धन न झाल्यास नामशेष होण्याचा धोका संभवतो. ही वनस्पती प्रामुख्याने झाडावर आढळते. मात्र नाशिकमध्ये संशोधकांना ती खडकावर सापडली आहे. महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. ज्ञानेश्वर खांडबहाले व इतर प्राध्यापक, तसेच विद्यार्थी कन्हैया थेटे, हेमंत चौरे यांनी ही कामगिरी केली आहे..Pune Heavy Rain: ताम्हिणी घाटमाथ्यावर २१० मिलिमीटरची नोंद.स्थानिक भाषेत या वनस्पतीला ‘फुलपाखरू अमरी’ असेही संबोधले जाते. या संशोधनासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह कार्यकारिणी, पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व राज्यभरातील संशोधकांनी अभिनंदन केले आहे..दक्षिण भारत, उत्तर अंदमानात आढळणारी वनस्पतीभारतातील इतर भागांत ही वनस्पती प्रामुख्याने मोठ्या वृक्षांवर आधार घेऊन वाढताना आढळते. नाशिकमध्ये ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सुमारे ७२२ मीटर उंचीवर, थेट खडकावर जिल्ह्याच्या अप्पर वैतरणा धरणाच्या दक्षिणेकडील परिसरातील ओंडली, नागोसली व वैतरणा कॉलनी या गावांच्या लगत असलेल्या ढोऱ्या डोंगर अधिवास क्षेत्रात आढळून आली आहे..Fish Species : किली : शोभिवंत माशाची प्रजात.आकाराने लहान असली, तरी रचना अतिशय देखणी आहे. झाडांच्या खोडांवर शेवाळांबरोबर वाढणारी ही प्रजाती मुख्यत्वे दक्षिण भारत आणि उत्तर अंदमानमध्ये आढळते. ही वनस्पती झाडांच्या खोडावर, शेवाळाच्या सोबतीने उगवते. त्याची पाने एक-दोन सेंटिमीटर लांबीची असतात. सुंदर नक्षीदार पाने अंडाकृती आकाराची असून, ती फुलपाखरासारखी दिसतात. या वनस्पतीचा फुलोरा छोटा असून, फुल जून-जुलैमध्ये उमलतात..‘पोरपॅक्स जर्डोनियाना’ ही वनस्पती जिल्ह्यातील ढोऱ्या डोंगरावर आढळून आल्याने ही नोंद स्थानिक जैवविविधतेच्या अभ्यासासाठी आणि वनस्पती संरक्षणासाठी महत्त्वाची बाब आहे.डॉ. ज्ञानेश्वर खांडबहाले, वनस्पतिशास्त्र विभाग, केटीएचएम महाविद्यालय.पर्यावरणातील बदल, जंगलतोड व अधिवास नष्ट होण्यामुळे वृक्ष आणि प्राणी यांच्या अनेक प्रजाती संकटात आहेत. म्हणूनच अशा वनस्पतींचे संवर्धन अत्यावश्यक आहे. डॉ. एस. एस. काळे, प्राचार्य, केटीएचएम महाविद्यालय.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.