Soybean Snail : शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव का वाढतोय?

Team Agrowon

महाराष्ट्रात प्रादुर्भाव जास्त

महाराष्ट्रात गोगलगायीचा प्रादुर्भाव मागच्या दोन वर्षात अचानक वाढलेला दिसतोय. 

Soybean Snail | Agrowon

प्रजननासाठी अनुकूल वातावरण

महाराष्ट्रात गोगलगायीचा प्रादुर्भाव मागच्या दोन वर्षात अचानक वाढलेला दिसतोय. सततचं ढगाळ, दमट, पावसाळी वातावरण गोगलगायीच्या प्रजननासाठी अनुकूल असल्याने प्रजनन जलद होऊन गोगलगायींची संख्या अनेक पटीने वाढते.

Soybean Snail | Agrowon

गोगलगायीची दुसरी पिढीही सक्रिय

त्यातच गेल्या दोन, तीन वर्षांत म्हणजेच २०२० आणि २०२१ या वर्षात पावसाचा कालावधी लांबल्यानं शंखी गोगलगायीची दुसरी पिढीही सक्रिय झाली. 

Soybean Snail | Agrowon

पावसाची अनियमितता

पुढील डिसेंबर-जानेवारी महिन्यात अति थंड व अति उष्ण वातावरणात त्या सुप्तावस्थेत राहिल्या. त्यानंतर २०२२ च्या खरीप हंगामात लवकर पाऊस पडला. 

Soybean Snail | Agrowon

दोन्हीही पिढ्या खरीप २०२२ मध्ये सक्रिय

मागील वर्षीच्या सुप्तावस्थेतील दोन्हीही पिढ्या खरीप २०२२ मध्ये सक्रिय झाल्या. 

Soybean Snail | Agrowon

गोगलगायीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष

या काळात लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा व रेणापूर, धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब व उमरगा व बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी व केज तालुक्यातील काही गावात खरीप पिकांच्या पेरणीनंतर कमी-अधिक पाऊस सतत राहिला. त्यामुळे गोगलगायीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाल्याने रोपावस्थेतील पिकांचे मोठे नुकसान झाले. 

Soybean Snail | Agrowon

गोगलगायींच्या संख्येत झपाट्याने वाढ

शंखी गोगलगायी या उभयलिंगी असतात. म्हणजेच एकाच आकाराच्या दोन गोगलगायींचं मिलन झाल्यास दोन्ही गोगलगायी अंडी देतात. एक मोठी आणि दुसरी लहान गोगलगाय यांचे मिलन झाल्यास फक्त मोठी गोगलगाय अंडी देते. यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

Soybean Snail | Agrowon
Kharif Sowing | Agrowon
आणखी पाहा...