Team Agrowon
राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे. तर मराठवाड्यात मात्र जुलै महिना संपत आला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही.
जूनच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या भरवशावर सोयाबीन आणि कापसाच्या पेरण्या झाल्या. पण या पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला.
रिमझिम पडत असलेल्या पावसानं गोगलगायसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे.
जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असताना पीक मोठं होण्याच्या आतच गोगलगाय फस्त करून टाकत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांवर कापूस आणि सोयाबीनच्या दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
दररोज सकाळी शेतीत गोगलगायचा सडा पडलेला असतो. तो वेचून काढाव्या लागत आहेत.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात पाहणी करुन तात्काळ गोगलगायने प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.