Jalgaon News: खानदेशात अतिपावसाने काही भागांत मूग पिकाची हानी झाली आहे. काळ्या कसदार व सखल क्षेत्रातील मूग पीक कमी पावसातही बऱ्यापैकी होते. परंतु पावसाने त्यात हानी झाली आहे. खानदेशात सुमारे २२ ते २५ दिवस पाऊस नव्हता. पण काळ्या कसदार, सखल क्षेत्रातील जमिनीत मूग पीक बरे होते. .कारण जून, जुलैमधील पावसात मूग पिकास फुलोरा तयार झाला. नंतर शेंगाही लागल्या. आर्द्रतेच्या स्थितीत शेंगा पक्व झाल्या. त्या काढणीवर येतानाच अतिपाऊस झाला आहे. मुगाची हानी अमळनेर, पारोळा, धरणगाव, जळगाव, जामनेर आदी भागांत झाली आहे. कारण शेंगा काढणी, तोडणीसाठी वाफसा हवा आहे..Moong Crop Disease: मुगावरील लिफ क्रिंकल रोगाचे व्यवस्थापन.काही शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीने वाफसा नसतानादेखील काढणी करून घेत आहेत. कारण पावसाळी वातावरण असून, आणखी पाऊस आल्यास नुकसान होण्याची भीती आहे. यंदा मूग पेरणी खानदेशात कमी झाली. कमाल शेतकऱ्यांनी नुकसानीच्या भीतीने मका लागवड केली. यात मूग उत्पादन कमी आहे. यामुळे दर टिकून आहेत..Moong Urad Crop Protection: मूग आणि उडीद पीक वाचवण्यासाठी असे करा किडींचे नियंत्रण .पण उत्पादन हाती यावे यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात १५ ते १६ हजार हेक्टरवर मूग पेरणी अपेक्षित होती. तर खानदेशात एकूण २५ ते २६ हजार हेक्टरवर मूग पेरणी होईल, अशी अपेक्षा होती. पण मूग पेरणी सुमारे १९ हजार हेक्टरवर झाली. जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर मूग पीक आहे. पीकस्थिती जून, जुलैत बरी होती. परंतु पावसाचा खंड पडल्याने पीकस्थिती काहीशी खराब झाली..पण काळ्या कसदार, मुबलक सेंद्रिय कर्ब असलेल्या जमिनींत मूग पीकवाढ बरी होती. पिकात काढणी पोळा सणापूर्वीच सुरू होईल, अशी स्थिती होती. त्यात पाऊस आला. पाऊस अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार आहे. काही भागांत मध्यम ते हलका आहे. शुक्रवारपासून (ता. १५) अनेक भागांत पाऊस सुरू आहे. काही भागांत दुपारी पाऊस असतो. तर काही भागांत दुपारी उघडीप असते. अशा स्थितीत शेतकरी मूग काढणी करून घेत आहेत. .नीरभ्र वातावरणाची गरजमूग काढणीनंतर शेंगा वाळण्यासाठी निरभ्र, कोरडे वातावरण नाही. यात शेतकरी आपल्या घरात, बंदिस्त गोठ्यात टेबल फॅन, पंख्याच्या मदतीने शेंगा वाळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. रात्री पाऊस व दुपारी ऊन राहिल्यास मूग पीक बऱ्यापैकी हाती येऊ शकते. कारण शेंगा तोढणी व काढणी होईल. तसेच शेंगाही वाळतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.