Sugarcane cultivation
Sugarcane cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultivation : नांदेड विभागात यंदा एक लाख ६३ हजार हेक्टरवर उसाची लागवड

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : नांदेड विभागातील चार जिल्ह्यांत गाळप हंगाम २०२३-२०२४ साठी एक लाख ६३ हजार ८५५ हेक्टरवरील ऊसगाळपासाठी उपलब्ध होणार आहे. पुढील हंगामासाठी विभागातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना गाळप परवानासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू असल्याची माहिती नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून मिळाली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात गाळप हंगाम २०२३-२०२४ मध्ये नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील अंदाजित ३० ते ३५ साखर कारखाने आगामी गाळप हंगामात सुरू होण्याची शक्यता आहे. यात खासगी व सहकारी साखर कारखान्यांचा समावेश असेल. विभागात ऑक्टोबर महिन्यात गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे.

यासाठी विभागात गाळपासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाचे क्षेत्र कारखाना आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या निश्‍चित केला आहे. विभागात आगामी हंगामात गाळपासाठी शेतकऱ्यांनी कारखान्यांकडे तीन लाख ६ हजार ९७५ हेक्टर क्षेत्राची नोंद केली आहे.

तर कृषी विभागाने एक लाख ४१ हजार २०७ हेक्टरवर ऊस लागवडीचा अंदाज व्यक्त केला आहे. तर कृषी विभाग आणि साखर सहसंचालक कार्यालयाने संयुक्तरीत्या एक लाख ६६ हजार ८५५ हेक्टरवर ऊस लागवड निश्‍चित केली आहे. विभागात नांदेड व हिंगोली जिल्ह्यांची उसाची उत्पादकता हेक्टरी ७० टन, परभणी जिल्ह्याची ६० टन, तर लातूर जिल्ह्याची उत्पादकता ७२ टन आहे.

पुढील हंगामात उत्पादन घटीचा अंदाज

जूनमध्ये लांबलेला पाऊस, त्यानंतरचा पावसाचा खंड यामुळे उसाच्या वाढीवर यंदा विपरीत परिणाम दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लोकरी मावावर प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, विभागात गाळप हंगाम २०२३-२०२४ मध्ये उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

जिल्हानियाह ऊस लागवड हेक्टरमध्ये

जिल्हा कृषीचा अंदाज कारखान्याकडील नोंद संयुक्तीक नोंद

नांदेड ३८,६८३ ३७,११० ३४,२४२

हिंगोली ८,५७१ ३५,४७७ १८,२५६

परभणी ३९,६९७ ६२,९७२ ५०,८१६

लातुर ५४,२५५ १,७१,४१५ ६३,५४१

एकूण १,४१,२०७ ३,०६,९७५ १,६६,८५५

एक कोटी १२ लाख टन गाळपाचा अंदाज

नांदेड विभागातील लातूर, हिंगोली, नांदेड व परभणी या जिल्ह्यांतून आगामी हंगामात एकूण एक कोटी १२ लाख ९८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने व्यक्त केला आहे. यात नांदेड जिल्ह्यात २३ लाख ९६ हजार टन, हिंगोली जिल्ह्यात १२ लाख ७७ हजार टन, परभणी जिल्ह्यात ३० लाख ४८ हजार टन, तर लातूर जिल्ह्यात ४५ लाख ७४ हजार टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

Farmer Registration : रेशीम शेतीसाठी पाचशे शेतकऱ्यांची नोंदणी

Ravikant Tupkar : 'काय कारवाई करायची ती खुशाल करा!'; तुपकरांचे थेट राजू शेट्टींना आव्हान

SCROLL FOR NEXT