Sugarcane Cultivation : उसाची ५९ लाख हेक्टरवर लागवड ; गेल्या वर्षीपेक्षा चार लाख हेक्टरने क्षेत्रात वाढ

Sugarcane Crop : देशात गेल्या वर्षीपेक्षा चार लाख हेक्टरने उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
Sugarcane Farm
Sugarcane FarmAgrowon

Kolhapur News : देशात गेल्या वर्षीपेक्षा चार लाख हेक्टरने उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षी या कालावधीअखेर ५५ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. यंदा ५९ लाख हेक्टरपर्यंत उसाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ लाख हेक्‍टरनी ऊस लागवड वाढली आहे. जुलैमध्ये देशात काही प्रमाणात झालेल्या पावसाने या ऊस लागवडी वाढल्‍या आहेत. ३१ ऑगस्टअखेरची ही आकडेवारी आहे.

Sugarcane Farm
Sugar Market : साखर उत्पादन आणि निर्यातीतही ब्राझील अग्रस्‍थानी राहणार

उसाच्या लागवडीमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक ही राज्‍ये प्रामुख्याने आघाडीवर आहेत. देशाच्‍या एकूण ऊस लागवडीपैकी सुमारे ७० टक्के ऊस क्षेत्र या राज्यांमध्ये असते. जूनपर्यंत पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी ऊस लागवड धीम्या गतीने सुरू होती. गेल्‍या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये २८ लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. तर १२ लाख हेक्‍टरवर महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र होते. जुलैच्या उतरार्धात लागवडीने वेग घेतला.

Sugarcane Farm
Sugarcane Cultivation : मॉन्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा; आडसाली ऊस लागवड खोळंबली

दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्‍ट्रात लागवडी धीम्या गतीने सुरू आहेत. जर सप्टेंबरमध्ये अपेक्षेनुसार पाऊस झाला तर पुढील दोन महिन्यांत उस लागवडी वेगात होतील, अशी शक्यता आहे. कर्नाटकातही अशीच परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशात काही भागांत चांगला पाऊस झाल्याने सध्‍या या राज्यात उस लागवडी चांगल्‍या आहेत.

यंदाच्‍या हंगामात उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असली तरी पुढील हंगामात पाऊस चांगला झाल्‍यास उत्पादनात वाढ होऊ शकते. उत्पादनात घटीचे कारण हे क्षेत्राएवजी पावसाचे व्यस्त प्रमाण हेच असल्याने क्षेत्र वाढूनही उत्पादनात घट येत असल्याचा विरोधाभास होत असल्याचे चित्र ऊस उद्योगाचे आहे.

३९८ लाख हेक्टरवर भात लागवड

कृषी मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार देशात ३९८ लाख हेक्‍टरवर भात, भरडधान्‍याच्या १८१ लाख, तेलबियांच्या १९० लाख, तर सोयाबीनच्या १२५ लाख टन तर कापसाच्या १२२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. देशात एकूण १०७७ लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी ३१ ऑगस्टअखेर १०७३ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्‍या होत्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com