Sugarcane Cultivation : पावसाअभावी आडसाली ऊस लागवडीत घट

Sugarcane Season : गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी तब्बल एक लाख २३ हजार ८५६ हेक्टरने लागवड कमी झाली असल्याची स्थिती आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon

Pune News : पावसाचे जवळपास अडीच महिने होत आले असून, अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांत दमदार पाऊस झालेला नाही. त्याचा फटका आडसाली उसाच्या लागवडीला बसला असून यंदा केवळ १९ टक्केच लागवडी झाल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी तब्बल एक लाख २३ हजार ८५६ हेक्टरने लागवड कमी झाली असल्याची स्थिती आहे. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास पुढील वर्षी साखर कारखान्यांसमोर उसाचा मोठा प्रश्‍न उपस्थित राहणार असल्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत.

यंदा जूनच्या अखेरीस काही प्रमाणात पावसाने सुरुवात केली. जुलैमध्ये पहिल्या पंधरवड्यात पाऊस पडला नव्हता. राज्यात एक जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या ६१२.३ मिलिमीटरपैकी ६०३.५ मिलिमीटर म्हणजेच ९८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ७२२.२ मिलिमीटर म्हणजेच ११८ टक्के पाऊस झाला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. इतर सर्व जिल्ह्यांत शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

Sugarcane
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकितप्रकरणी चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

सध्या ऑगस्ट महिना सुरू असला, तरी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यातच पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. खरीप हंगाम वाया गेल्याची स्थिती असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे.

राज्यात सरासरीच्या दहा लाख ९५ हजार ७५ हेक्टरपैकी दोन लाख दहा हजार ५४६ हेक्टर म्हणजेच १९ टक्केच क्षेत्रांवर ऊस लागवडी झाल्या आहेत. बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी १५ जुलै ते १५ ऑगस्टच्या दरम्यान करतात. पूर्व हंगामी उसाच्या १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत करतात. आता आडसाली उसाच्या

Sugarcane
Sugarcane Cultivation : सोलापूर जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र

लागवडी संपल्या असून पूर्व हंगामी उसाच्या लागवडी सुरू होणार आहेत. गेल्या वर्षी याच काळात ३ लाख ३४ हजार ४०२ हेक्टर म्हणजेच ४३ टक्के लागवडी झाल्या होत्या. दर वर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात.

लागवडी केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस कारखान्याला तोडणीस देतात. यंदा ऊस आगार असलेल्या पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांत ऊस लागवडी घटल्याचे चित्र आहे. मराठवाडा व विदर्भातही फारशा लागवडी झालेल्या नाहीत.

दृष्टिक्षेपात

विभागनिहाय उसाचे सरासरी क्षेत्र व ऊस लागवड (हेक्टरमध्ये) ः

विभाग --- सरासरी क्षेत्र -- प्रत्यक्ष लागवड -- टक्के

कोकण -- १६११ -- ४४१ -- २७

नाशिक -- ४८,२४५ -- २७,८४२ -- ५८

पुणे -- ३,४३,३९२ -- ७२,०६२ -- २१

कोल्हापूर -- ४,२०,५८९ -- ५०,५१९ -- १२

छत्रपती संभाजीनगर -- ९६,९१९ -- २५,५१७ -- २६

लातूर -- १,६८,८९० -- २३,९६५ -- १४

अमरावती -- ८,१७१ -- ८,०२८ -- ९८

नागपूर -- ७,२५८ -- २,१७३ -- ३०

यंदा १५ ते १६ एकरांवर ऊस लागवडीचे नियोजन केले होते. पावसाचे अडीच महिने झाले असले तरी पाऊस कमी आहे. गावाजवळून भीमा नदीचे पाणी येते. त्यामुळे अकरा एकरांवर लागवडी केली आहे. परंतु पाऊस नसल्या कारणाने ऊस लागवडीचे क्षेत्र कमी केले असून सर्व पिकांना ठिबक केले आहे.
- रामचंद्र नागवडे, कृषिभूषण शेतकरी, बाभूळसर, शिरूर, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com