Agrowon Exhibition Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Exhibition : कृषी ज्ञानसोहळ्याची यशस्वी सांगता

मराठवाड्याच्या भूमीत ‘सकाळ अॅग्रोवन’तर्फे आयोजित केलेले हे सलग तिसरे कृषी प्रदर्शन यशस्वी झाल्यामुळे या प्रदर्शनात सहभागी झालेल्या कंपन्या, शासकीय व निमशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, बॅंका व उद्योग संस्थांनी समाधान व्यक्त केले.

Team Agrowon

औरंगाबाद ः कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, (Agriculture Technology) आधुनिक शेती (Modern Agriculture) पद्धती आणि शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी औरंगाबादमध्ये भरलेल्या चार दिवसीय अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाची (Agrowon Exhibition) यशस्वी सांगता सोमवारी (ता. १६) झाली. तळमळीने प्रदर्शनाला हजेरी लावत राज्यभरातील हजारो शेतकरी आधुनिक शेतीची शिदोरी घेत नव्या हिमतीने शेतशिवारांकडे परतले.

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक कन्हैया अॅग्रो तर बसवंत गार्डन हे असोसिएट पार्टनर होते. के. बी. एक्सपोर्ट्स, बी. जी. चितळे डेअरी, एमआयटी औरंगाबाद, तृप्ती हर्बल, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मेडा-महाऊर्जा, आत्मा-औरंगाबाद यांनी को-स्पॉन्सर्स तर इफ्कोने गिफ्ट स्पॉन्सर्स म्हणून या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. प्रदर्शनामुळे औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमधील ‘कलाग्राम’ परिसराला कृषिपंढरीचे स्वरूप आले होते.

मराठवाड्याच्या भूमीत ‘सकाळ अॅग्रोवन’तर्फे आयोजित केलेले हे सलग तिसरे कृषी प्रदर्शन यशस्वी झाल्यामुळे या प्रदर्शनात सहभागी झालेल्या कंपन्या, शासकीय व निमशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, बॅंका व उद्योग संस्थांनी समाधान व्यक्त केले.

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड तसेच राज्याचे फलोत्पादन, रोहयो मंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे अशा मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या.

शास्त्रीय ज्ञानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अशा नियोजनबद्ध व उत्तम प्रदर्शनामुळे बळ मिळते आहे, अशा शब्दात या मंत्र्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

शेतीत प्रगती साधायची असल्यास अॅग्रोवनचे वाचन व उपक्रमांमधील सहभाग शेतकऱ्यांनी कायम ठेवायला हवा, असा आग्रही सल्ला या मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना केला.

प्रदर्शनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रोवनसह अनेक कंपन्यांनी बक्षीसे व भेटवस्तूंचा वर्षाव केला. शेतकऱ्यांनीदेखील प्रदर्शनासाठी केवळ गर्दी न करता उत्पादन पाहून थेट निर्णय घेणे पसंत केले.

शेतकऱ्यांनी साध्या खुरप्यापासून ३३ लाखाच्या बॅकहो लोडरपर्यंत खरेदी केली. शेतीविषयक विविध पुस्तके, बियाणे, शेततळ्याचे कापड, हार्वेस्टर, ट्रॅक्टर, कीडनाशके, कीटक सापळे अशा किती तरी वस्तुंची प्रत्यक्ष खरेदी केली. त्यातून लक्षावधी रुपयांची उलाढाल झाली.

कृषिपूरक उत्पादने, माहिती तंत्रज्ञान व डिजिटल सेवा देणारी प्रणाली, सिंचन साधनांचीही खरेदी केली. गावशिवारातील शेतकरी उत्पादक कंपन्यांपासून देशी विदेशी बाजारातील प्रख्यात कंपन्यांची उत्पादने या प्रदर्शनात विकली गेली. तळागाळातील शेतकऱ्यांनी या कंपन्यांच्या उत्पादनांची बारकाईने माहिती घेत शंकानिरसन केले.

‘या प्रदर्शनात गर्दीपेक्षाही शास्त्रशुद्ध ज्ञानाची आस लागलेले दर्दी शेतकरी सहभागी झाले होते. त्यामुळे जाणकार शेतकरी ग्राहकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावल्याने अॅग्रोवनच्या उपक्रमावर आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया प्रदर्शनात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली.

प्रदर्शनाच्या निमित्ताने बसवंत गार्डनने आयोजित केलेले फळ प्रदर्शन, सेवरगाव, मधमाशी पालन सामग्री प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रोत्साहक ठरले. त्यातून अनेक शेतकऱ्यांनी मधमाशीपालन प्रशिक्षण घेण्याचा तसेच नव्या फळबागा उभारण्याचा संकल्प केला.

मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात अनेक समस्यांशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची जिद्द वाढविणारे हे प्रदर्शन होते, अशी मनमोकळी प्रतिक्रिया या प्रदर्शनाला भेट देणारे कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत होते.

प्रदर्शनामुळे शेतकरी झाला भावुक

अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाला उत्सुकतेने भेट देणारा प्रत्येक शेतकरी चारही दिवस काही तरी मिळवूनच प्रवेशद्वारातून बाहेर पडत होता. बीडच्या माजलगाव भागातील मनूर गावातून आलेले ६५ वर्षाचे शेतकरी व अॅग्रोवनचे वाचक संपतराव पाटील यांनी प्रदर्शनस्थळी पाय ठेवताच ते भावुक झाले.

‘‘कोरोनामुळे आम्ही शेतकरी जणूकाही तुरुंगात असल्यासारखेच गावशिवारांमध्ये अडकून पडलो होतो. अॅग्रोवन कृषी प्रदर्शनामुळे गावाबाहेर पडून शेतीविषयी मनमोकळी माहिती घेता आली. अॅग्रोवनचे आमच्यावर खूप उपकार आहेत.’’ असे भावपूर्ण उद्गार संपतरावांनी काढले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

Jan Suraksha Bill: ‘जनसुरक्षा’ दोन्ही सभागृहांत मंजूर

Animal Husbandry Status: पशुपालनाला आता कृषी समकक्ष दर्जा

Cotton Mission 2030: देश कापूस क्षेत्रात २०३० पर्यंत स्वयंपूर्ण करणार

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT