Papaya  Agowon
ताज्या बातम्या

Papaya Weed Control : पपई पिकात तणनियंत्रणाला वेग

Papaya Farming : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा सुमारे ७०० ते ८०० हेक्टरने वाढली आहे. पीक जोमात असून, त्यात सध्या तणनियंत्रणासह खते देण्याचे काम सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा सुमारे ७०० ते ८०० हेक्टरने वाढली आहे. पीक जोमात असून, त्यात सध्या तणनियंत्रणासह खते देण्याचे काम सुरू आहे.

पपई पिकही रोगराईच्या दृष्टीने नाजूक मानले जाते. प्रतिकूल वातावरणात रोगांना पीक लवकर बळी पडते. यामुळे निश्चित खते, किडनाशकांची मात्रा दिली जात आहे.

तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रकोप टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाहीदेखील केली जात आहे. शेत तणमुक्त ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपईची लागवड झाली आहे.

त्यापाठोपाठ धुळे व जळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे सहा हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. फेब्रुवारीच्या मध्यात लागवड सुरू झाली. एप्रिलच्या सुरवातीपर्यंत लागवड सुरू होती.

लागवड गादीवाफा व ठिबक सिंचन तंत्राच्या मदतीने झाली आहे. १० बाय सहा, १० बाय सात फूट या अंतरात लागवड झाली आहे. त्यात उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी कलिंगडाचे आंतरपीकही घेतले. पिकाची वाढ मेनंतर जोमात सुरू झाली. एकदा बेसल डोस दिल्यानंतर शेतकरी ठिबकद्वारे विद्राव्य खते देत आहेत.

तसेच चार महिन्यांच्या पिकात तीनदा फवारण्यादेखील शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत. पपईचे दर गेल्या हंगामात अस्थिर होते. परंतु पीक अनेकांना परवडले. यामुळे लागवड वाढली आहे. पिकात ऑगस्टअखेर फुले लागण्यास सुरवात होईल.

ऑक्टोबरमध्ये नंदुरबार, जळगावमधील मुक्ताईनगर, चोपडा भागात काढणी सुरू होईल. फुले, फळधारणा यासंबंधीदेखील शेतकरी आवश्यक अन्नद्रव्ये किंवा अन्नघटक पिकास देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT