E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
ताज्या बातम्या

E-Peek Pahani : रब्बी हंगामातील ई-पीकपाहणी नोंदणीसाठी विशेष मोहीम

Team Agrowon

परभणी : यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामातील संपूर्ण पेरणी (Rabi Season Sowing) क्षेत्राची ई-पीकपाहणी (E-Peek Pahani) पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी गुरुवारपासून (ता.१९) ते शनिवार (ता. २१) हे तीन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. मोबाईल अॅपद्वारे पेरणी क्षेत्राची १०० टक्के ई-पीकपाहणी नोंदणी करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी बुधवारी (ता. १८) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

या वेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार गणेश चव्हाण उपस्थित होते. डॉ. काळे म्हणाले, की शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी व्हर्जन -२’ हे मोबाईल अॅप डाऊनलोड करावे.

ई पीक पाहणी करताना विशेष मोहिमेमध्ये पीक पेराच्या नोंदणी घेताना काही तांत्रिक अडचणी आल्यास जिल्हा प्रशासनाकडून संबंधित तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली मदत कक्षाची स्थापन करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील शेतीपिके, बहुवार्षिक पिकांची नोंदणी करता येणार आहे. शेतातील अक्षांक्ष-रेखांक्ष नुसार पिकाच्या

भौगोलिक स्थानाचीही नोंद होणार आहे. इंटरनेट उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांनी पिकांचे काढलेले छायाचित्र ते इंटरनेटच्या संपर्कात आल्यावर माहिती सहअपलोड करता येणार आहे. हे तंत्रज्ञान खूप सोपे आणि वापरण्यास अत्यंत सुलभ आहे. शेतकऱ्यांच्या पीक लागवडीच्या क्षेत्राची अचूक नोंद होणार आहे.

नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पेऱ्याच्या माहितीमध्ये ४८ तासात दुरुस्ती करता येणार आहे. पीक पाहणी मध्ये किमान १० टक्के तलाठ्यांकडून पडताळणी होणार आहे.

क्षेत्रीय स्तरावर पीक पाहणीची अचूक माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रकियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे, कृषी पतपुरवठा धोरण सुलभ करणे, पीकविमा दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, याशिवाय नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अचूक नोंद आणि मदत करणे शक्य होईल.

शेतकऱ्यांद्वारे करण्यात येणारी ही ई-पीकपाहणी नोंदणी स्वयं प्रमाणित मानण्यात येणार आहे. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड योजनेतील धान्य खरेदी-विक्री नोंदणीसाठी आवश्यक असून जलसिंचनाच्या स्त्रोताची नोंद ७/१२ वर केली जाते.

त्यामुळे शेतकऱ्यांना कुसून योजनेत सौर कृषीपंपासाठी अर्ज करणे सुलभ होते. बांधावरील झाडांची नोंद करण्याचीही सुविधा येथे उपलब्ध, असे डॉ. काळे म्हणाले.

खरिपात सर्वाधfक तीन लाखांवर ई-पीकपाहणी

यंदाच्या (२०२२-२३) खरीप हंगामात जिल्ह्यातील ५ लाख ४६ हजार ६५९ शेतकरी खातेदारांपैकी ३ लाख ६४ हजार ६४६ शेतकऱ्यांनी ४ लाख ७२ हजार २७८.५३ हेक्टरवरील (७३.६० टक्के) तर रब्बी हंगामातील ३ लाख ४ हजार २३२ पैकी ५५ हजार ७२६ हेक्टरवरील (१८.३२ टक्के) ई पीक पाहणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT