E Pik Pahani
E Pik Pahani Agrowon

E Peek Pahani : जिल्हाधिकाऱ्यांकडून फाळेगावला पीकपाहणी

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बुधवारी (ता.१६) वाशीम तालुक्यातील फाळेगाव (थेट) शिवारात शेतकरी गट आणि कृषी विभागाने बांधलेल्या वनराई बंधाऱ्याची पाहणी केली.
Published on

वाशीम ः जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बुधवारी (ता.१६) वाशीम तालुक्यातील फाळेगाव (थेट) शिवारात शेतकरी गट आणि कृषी विभागाने (Department of Agriculture) बांधलेल्या वनराई बंधाऱ्याची पाहणी केली. तसेच पिकांची पाहणी करीत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड, तंत्र अधिकारी प्रकाश कोल्हे, मंडळ कृषी अधिकारी भागवत किंगर उपस्थित होते.कृषी पर्यवेक्षक राजेश राठोड, कृषी सहायक दत्ता शिंदे, महादेव सोळंके, श्रीनिवास मुंडे, बाबाराव राठोड आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी शेतकरी गट व कृषी विभागाने श्रमदानातून संतोष मोतिराम कोरडे यांच्या शेतात बांधलेला वनराई बंधारा दाखवत माहिती दिली.

E Pik Pahani
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

श्री. तोटावार यांनी जिल्ह्यात रब्बी हंगामात नव्याने लागवड करण्यात येत असलेले राजमा पिकाची माहिती देताना ३५ एकर क्षेत्रावर फाळेगाव (थेट) या गाव शिवारात या पिकाची लागवड झाली असून, १९ शेतकऱ्यांनी ही लागवड केल्याची माहिती दिली. श्री. षण्मुगराजन यांनी या वेळी कोरडे यांच्या राजमा लागवड क्षेत्रासही भेट दिली.

फाळेगाव येथे शेतकरी गटामार्फत राबविण्यात येणारा दुग्ध संकलनाचा उपक्रमही शेतकऱ्यांनी या वेळी दाखविला. त्या ठिकाणी होत असलेली दुग्ध संकलन तसेच संकलनाच्या पद्धती व दुग्ध चाचणी विषयीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तसेच कांदा बीजोत्पादन क्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांशी हितगुज करून बीज उत्पादन कांदा लागवडीविषयी माहिती घेतली. फाळेगाव (थेट) येथील गजानन कोरडे, नारायण भिमटे, भारत कोरडे व शेतकरी उत्पादक कंपनीचे तसेच शेतकरी गटाचे शेतकरी या वेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com