ताज्या बातम्या

Soybean Yellow Mosaic : पिवळा मोझॅकने सोयाबीन पीक धोक्यात, मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची मागणी

Vidarbha Soybean Farming : विदर्भात सर्वाधिक सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घेतले जाते यामध्ये सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Soybean Farming : राज्यात पाऊस कमी झाल्याने पिकांवर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान विदर्भात सर्वाधिक सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घेतले जाते यामध्ये सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातची पिके निसटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक विशेष पॅकेज चंद्रपूर जिल्ह्यासाठी जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पिक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घडल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील ही परिस्थिती कळताच मंत्री मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोणा (खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळला.

या रोगामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, देवराव भोंगळे, सुदर्शन निमकर, सुनिल उरकुडे, अजय राठोड, अरुण मस्की, हरीदास झाडे, वामन तुरानकर, दिलीप गिरसावळे, कृषी सहाय्यक डांगे हे उपस्थित होते.

यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी तातडीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे नुकसाभरपाईची मिळण्यासाठी विनंती केली. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही पत्र पाठविले. मृदा संतुलनात मोठा बिघाड निर्माण झाला आहे. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे.

सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग सध्या आहेत. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. पीक नुकसानीसंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हरभरा पिकाचेही गारपिटीमुळे नुकसान झाले होते. याशिवाय ५० हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांपैकी काहींच्या खात्यात तांत्रिक कारणाने रक्कम जमा झाली नव्हती, ती रक्कम जमा करण्याबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांचे लक्ष वेधले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT