Pomegranate Cultivation : ऐन हंगामात डाळिंब बागांवर पाणीटंचाईचे संकट गडद

Pomegranate Season : डाळिंबाच्या हंगामाला सुरुवात झाली असून बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. दरम्यान नदी, कॅनॉलला पाणीच उपलब्ध नसल्याने पाण्याचे संकट निर्माण झाला आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ
Pomegranate Season
Pomegranate SeasonAgrowon

Sangli News : देशातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यात शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आगाप मृग आणि जून महिन्यात मृग बहर धरला आहे. आतापर्यंत पिकाला पाणी पुरले. परंतु पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याचे गडद संकट निर्माण झाले आहे. परिणामी, इथून पुढे डाळिंब बागा पाण्याशिवाय कशा जगवायच्या, असा प्रश्‍न डाळिंब उत्पादकांना पडला आहे.

देशात यंदाच्या हंगामात जूनमध्ये ४० हजार हेक्टरवर बागा धरल्या आहेत. या हंगामातील डाळिंबाची विक्री ऑक्टोबरपासून सुरू होते. शेतकऱ्यांनी बहर धरल्यापासून उपलब्ध पाण्यावर बागा चांगल्या साधल्या आहेत. पुरेसा पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने काडी चांगली झाली आहे. तसेच अपेक्षित फुलांचे सेटिंगही झाले आहे.

त्यातच ऐन पावसाळ्यात वाढत्या उष्णतेचा फटका बागांना बसला आहे. मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली असल्याने उत्पादनही ५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता डाळिंब संघाने व्यक्त केली आहे.

सध्या डाळिंबाच्या वजन वाढीचा काळ आहे. त्यामुळे बागेला पुरेसे पाण्याची गरज आहे. देशातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यात ऐन पावसाळ्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी, भूजलपातळी वाढ झाली नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर आतापर्यंत बागा फुलविल्या. आता पाण्याची कमतरता भासू लागली आहे. कॅनॉलला पाणी नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादक हतबल झाला आहे.

Pomegranate Season
Pomegranate Cultivation : डाळिंब लागवडीसाठी निवडा रोगविरहीत कलमे

पूर्वहंगामातील डाळिंब विक्रीला

देशात यंदा ५ ते १० टक्क्यांवर आगाप बहर धरला आहे. त्यानंतर डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने बागा चांगल्या फुलल्या आहेत. या बहरातील डाळिंबाची काढणी सुरू झाली आहे. आगाप मृग बहरातील डाळिंब बाजारात दाखल झाले आहेत. त्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिकिलोस २० ते २५ रुपयांनी दर जास्त मिळाला. डाळिंबाला प्रतवारी नुसार प्रतिकिलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गुजरातचा डाळिंब हंगाम संकटात

गुजरात राज्यातील निम्म्या भागात गेल्या चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे डाळिंब हंगाम अडचणीत सापडला आहे. परंतु इतर भागातील डाळिंब पीक चांगले असल्याची माहिती संघाने सांगितली.

यंदाच्या हंगामात उपलब्ध पाण्यावर हंगाम धरला. पण पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे ऐन हंगामात पाण्याची टंचाई भासत आहे. टॅंकरने पाणी देण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादक संकटात सापडला आहे.
-प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com