Soybean Rate
Soybean Rate Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Rate : सोयाबीन दरात किंचित सुधारणा

Team Agrowon

पुणे ःख्रिसमसच्या सुट्ट्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजार दोन दिवस सुरु झाला. पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) मोठी सुधारणा पाहायला मिळाली. बुधवारी १५ डॉलर प्रतिबुशेल्सवर सोयाबीनचे वायदे पोचले होते. तर देशातील काही बाजारांमध्येही सोयाबीनच्या दरात किंचित वाढ झाली होती. सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. सोयाबीनच्या दरात जानेवारीत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोचे दर चांगलेच घसरले आहेत. मागील महिन्यात टोमॅटोला सरासरी १५०० ते २००० रुपये दर मिळत होता. मात्र सध्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले आहेत. बाजारातील आवक वाढल्याने दरात घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर टोमॅटो आवक पुढील काळात मर्यादित झाल्यास सरासरी दर १ हजार रुपयांचा टप्पा पार करू शकतात, असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कमी उडीद
देशात सध्या उडदाचे दर चांगले आहेत. उडदाला सध्या सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. यंदा खरिपातील उडीद उत्पादन कमी राहिले. तसेच भारताचा मुख्य उडीद पुरवठादार असलेल्या म्यानमारमध्ये सध्या उडदाची उपलब्धता कमीच आहे. म्यानमारमध्ये उडदाची आवक जानेवारीत सुरु होते. मात्र आवकेचा मुख्य हंगाम फेब्रुवारीत असतो. त्यामुळे दोन महिने तरी म्यानमारमधून आयात कमी होईल. त्यामुळे देशातील उडीद बाजाराची मदार आता तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील पिकांवर आहे. या राज्यांतील उडीद लवकर बाजारात येईल. मात्र सध्या देशात उडदाचा पुरवठा कमी असल्याने दर तेजीत आहेत. यंदा सरकारने उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्याचे दर त्यापेक्षा जास्त आहेत. देशातील बाजारात सध्या सरासरी ५०० टन उडदाची आवक होत आहे. ही आवक मागीलवर्षी याच काळातील आवकेच्या तुलनेत जवळपास ८० टक्क्यांनी कमी आहे. त्यातच सध्या देशात गुणवत्तापूर्ण उडदाची उपलब्धता कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. उठाव चांगला मिळतोय. त्यामुळे यंदा उडदाचे दर टिकून राहतील. यंदा उडदाला सरासरी ७ हजार ते ७ हजार २०० रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

कापूस दरात काहीशी वाढ
देशातील बाजारात सोमवारी (ता. २६) कापूस दरात मोठी घट झाल्यानंतर मंगळवारी (ता.२७) दर स्थिरावले होते. मात्र बुधवारी (ता.२८) काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ झालेली दिसली. कापसाचे दर तुटल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. तसेच वायद्यांमध्ये कापूस दर वाढल्याने बाजार समित्यांमधील दरातही सुधारणा पाहायला मिळाली. कापसाला सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जानेवारीत कापसाचे दर वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

ज्वारीचे दर तेजीत
देशात सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. यंदा खरिपातील ज्वारी उत्पादन कमी झाले होते. तसेच अनेक महत्त्वाच्या ज्वारी उत्पादक भागांमध्ये परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे ज्वारी लागवडीला उशीर झाला. परिणामी रब्बीतील ज्वारी उत्पादनही कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. यंदा ज्वारीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT