Soybean Rate : स्टॉक लिमिट हटविल्याने सोयाबीन दरात सुधारणा

सोयाबीन वरील स्टॉक लिमिट हटविल्यानंतर विदर्भातील मुख्य बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांपर्यंत तेजी आली आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

नागपूर : सोयाबीन वरील स्टॉक लिमिट (Soybean Stock Limit) हटविल्यानंतर विदर्भातील मुख्य बाजार समितीमध्ये (Vidarbh Market Committee) सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) प्रतिक्विंटल पाचशे रुपयांपर्यंत तेजी आली आहे.परिणामी नव्या हंगामातील सोयाबीनला चांगला परतावा मिळू लागल्याने शेतकऱ्यांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे. कळमना बाजार समिती गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ४२०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल असताना या आठवड्यात सोयाबीनच्या दराने ४६५० ते ५६११ पर्यंत मुसळी घेतली.

Soybean Rate
Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

बाजारात खरीप हंगामातील नव्या सोयाबीनची आवक होताच दर पाच हजार रुपयांपेक्षा कमी झाले होते. दरातील सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान केंद्र सरकारने सोयाबीन साठवणुकी संदर्भातील मर्यादा संपुष्टात आणण्याचे जाहीर केले. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढली असून साठवणुकीवर भर दिला जात आहे.

त्याच कारणामुळे बाजारात सोयाबीन दर तेजीत आले आहेत. विदर्भातील कारंजा लाड (वाशिम), अमरावती, अकोला, हिंगणघाट, पांढरकवडा, यवतमाळ, वाशीम या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक होते. या सर्वच बाजार समितींमध्ये दराने ४०० ते ५०० रुपये अशी तेजी घेतली आहे. कळमना बाजार समितीत सध्या स्थितीत सोयाबीनची ५००० क्विंटल पेक्षा अधिकची आवक आहे. या बाजारात देखील गेल्या आठवड्यात ४२०० ते ५००० रुपये या दराने सोयाबीनचे व्यवहार झाले.

या आठवड्यात ४६५० ते ५६११ असा दर सोयाबीनला मिळाला. यापुढील काळात सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कळमना बाजारात सोयाबीन सोबतच हरभरा आवक देखील नियमित होत असून ती २४३ क्विंटल इतकी आहे. ४२०० ते ४४०० याप्रमाणे हरभऱ्याचे दर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Soybean Rate
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

तुरीची आवक कमी झाली असून ती अवघी पाच क्विंटल इतकी आहे. ६३०० ते ६६०१ रुपये यादराने तुरीचे व्यवहार झाले. गव्हाचे व्यवहार २५०० ते २६५० रुपये याप्रमाणे होत असून आवक २६६ क्विंटल इतकी आहे. तांदूळ आवक ६० क्विंटलची तर दर २७०० ते ३००० रुपये होते. बाजारात तुरीप्रमाणे ज्वारीची आवक देखील अवघी सात क्विंटल झाली.

२२०० ते २५०० रुपये असा दर ज्वारीला मिळाला. भुईमूग शेंगांची आवक देखील अंतिम टप्प्यात असून सोमवारी ८० क्विंटल इतकी अत्यल्प नोंदविण्यात आली. बाजारात सीताफळाची आवक ३४ क्विंटल इतकी आहे. सीताफळाच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घसरण अनुभवण्यात आली. गेल्या आठवड्यात ५००० ते ७००० सादर सीताफळाला होता. या आठवड्यात ५००० ते ६००० रुपयांपर्यंत दर खाली आले. बाजारातील पेरूची आवक वीस क्विंटल असून ३००० तिच्या हजार रुपये याप्रमाणे दर स्थिर आहेत.

Soybean Rate
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या नागपूरच्या कळमना बाजार समितीत संत्रा आवक तीन हजार क्विंटलवर पोहोचली आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना २२०० ते २८०० रुपये असा दर मिळत असून मध्यम आकाराच्या फळांना १५०० ते २००० आणि लहान फळांना ८०० ते ९०० रुपये असा दर प्रतिक्विंटलला मिळत आहे. बाजारात मोसंबीची आवक देखील असून ती १५०० क्विंटल आहे २४०० ते ३००० रुपये असा दर मोठ्या आकाराच्या फळांना मिळत असून मध्यमसाठी २००० ते २४०० आणि लहान फळांना १४०० ते १८०० असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com