Drought Shadow : छत्रपती संभाजीनगर खरीप हातचा गेला की पाण्याची उपलब्धता असल्यास शेतकरी रब्बीतून खरिपातील नुकसानीची भरपाई करून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु, यंदा सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत तोकडी व जमिनीतही ओल नसल्याने अजून छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात रब्बीची पेरणी दखलपात्र झाली नसल्याचे चित्र आहे..एल निनोच्या संकटाने यंदा खरिपापाठोपाठ यंदाच्या रब्बीवरही सुरुवातीलाच दुष्काळ आणला आहे. ऑक्टोबर अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असताना पेरणीचा टक्का काही पुढे सरकण्याला पोषक स्थिती नाही. एकीकडे जमिनीत पुरेशी ओल नाही, दुसरीकडे पाण्याच्या साठवणुकी अभावी छोट्या मोठ्या प्रकल्पांची दयनीय अवस्था झाल्याने सिंचनासाठी पाणी मिळेल किती हा प्रश्न आहे..Rabi Season Crisis: पावसाची तूट, रब्बी संकटात.जायकवाडी वगळता इतर छोट्या-मोठ्या प्रकल्पातून सिंचनासाठी आवश्यकतेप्रमाणे पाणी मिळण्याची आशा धूसरच आहे. त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसत असून आताच्या घडीला तीनही जिल्ह्यात केवळ १६,७४० हेक्टर वरच रब्बीची पेरणी झाली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात पेरणी झालेल्या १३७६६ हेक्टरसह जालना जिल्ह्यातील ३२५७ हेक्टर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केवळ १७.५० हेक्टरवरील रब्बी पेरणी पिकाचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..Farmer Crisis : पाइप, तुषार संच, केबल चोरीचे सत्र सुरूच; दुष्काळात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट.जिल्हानिहाय रब्बी पेरणी स्थितीछत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात केवळ १७.५० हेक्टर वर रब्बीची पेरणी झाली. त्यामध्ये २.५० हेक्टर वरील मका तर १५ हेक्टरवरील हरभरा पिकाचा समावेश आहे.जालना : जिल्ह्यात सुमारे ३२५७ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. यामध्ये १९०३ हेक्टर वरील रब्बी ज्वारी, २८५ हेक्टरवरील मका, १०३४ हेक्टर वरील हरभरा एक हेक्टर वरील सूर्यफूल व ३३.४ हेक्टरवर पेरणी झालेल्या करडई पिकाचा समावेश आहे.बीड : जिल्ह्यात रब्बी पिकांची सुमारे १३४६६ हेक्टरवर पेरणी झाली. त्यामध्ये ७७१६ हेक्टरवर रब्बी ज्वारी ५,६३७ सेक्टरवरील हरभरा व ११३ हेक्टर वरील गव्हाच्या क्षेत्राचा समावेश आहे..गेल्या वर्षी पाणी असल्याने आठ एकरात कांदा, गहू, हरभरा आदी पीक घेतली होती. यंदा जमिनीत ओलही नाही अन पाणीही नाही. जे थोडं पाणी उपलब्ध आहे त्यातून गतवर्षी लावलेली एक एकरातील केसर आंबा बाग जगविण्याची धडपड करतो आहे.- मिठुभाऊ चव्हाण, भांडेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर.आमच्या शिवारात पाच टक्के शेतकऱ्यांनी प्रचंड हिंमत दाखवून थोडी बहुत रब्बीची पेरणी केली. पण जमिनीत पुरेशी ओल नाही. पाणीही उपलब्ध नाही. गेल्या वर्षी एक एकर कांदा आणि एक एकर गहू घेणारा मी यंदा पाच-सहा गुंठे चाऱ्यासाठी ज्वारी पेरण्याची हिंमत दाखवू शकलो. ती चारा म्हणून उपयोगात येईल याची शाश्वती नाही.- रावसाहेब जाधव, जामखेड, जि. जालना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.