Khadkvasla Dam
Khadkvasla Dam Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : ‘खडकवासला’तून एक मे पासून दुसरे उन्हाळी आवर्तन

Team Agrowon

Pune News : खडकवासला प्रकल्पातील (Khadakvasla Dam) ४ धरणांत मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार नियोजन करून नवीन मुठा उजवा कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन (Water Cylce) सोडण्याचे ठरले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी (ता. २६) झाली. त्या वेळी ते बोलत होते.

खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रवींद्र धंगेकर, माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार,

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

पाटील म्हणाले, की यंदाच्या पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे. यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे.

तसेच शासनपातळीवरून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे.

धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल, यादृष्टिनेही नियोजन करण्यात येत आहे. पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते.

तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळित होतो, अशी लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. त्यावर महापालिकेने अभ्यास करून आठ दिवसात तांत्रिक उपायोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये गव्हाचे अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलास आग

SCROLL FOR NEXT