Kharip Crop Agrowon
ताज्या बातम्या

Kharip Crop : परभणातील १०८ गावांत हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी

यावर्षीच्या (२०२२) खरीप पिकांच्या हंगामी (नजर) पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आली.

टीम ॲग्रोवन

परभणी ः यावर्षीच्या (२०२२) खरीप पिकांच्या हंगामी (Kharip Season) (नजर) पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे (Parbhani District)शुक्रवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ६२ आणि पूर्णा तालुक्यातील (Purna Village) ४६ मिळून एकूण १०८ गावांची हंगामी (नजर) पैसेवारी ५० पेक्षा कमी आली आहे.

उर्वरित ७२८ गावांची पैसेवारी ५० पैसे पेक्षा आली आहे. यंदा खरीप पिकांची हंगामी पैसेवारी परभणी जिल्ह्याची सरासरी ५३.६६ पैसे तर हिंगोली जिल्ह्याची सरासरी ५४.५२ पैसे आली आहे.परभणी जिल्ह्यातील ८३६ गावामध्ये लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ६० हजार ८१५ हेक्टर आहे. यंदाच्या (२०२२) खरिपात ५ लाख २२ हजार ४५५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

एकूण ३८ हजार ३५९ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. सर्व गावांची खरीप पिकांची हंगामी (नजर) पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. गंगाखेड तालुक्यातील १०५ पैकी ६२ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी तर ४३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे.

पूर्णा तालुक्यातील ९४ पैकी ४६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी तर ४८ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावांमधील लागवडीयोग्य ३ लाख ९८ हजार ४२६ पैकी यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात ३ लाख ७६ हजार ७९७ हेक्टरवर पेरणी झाली.

यंदा एकूण ७ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. शुक्रवारी (ता. ३) जिल्हा प्रशासनातर्फे खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५४.५२ आली आहे.

परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी तसेच पावसाच्या खंडामुळे नुकसान झाल्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या उत्पादनात घट येत आहे. ३१ ऑक्टोंबर रोजी सुधारित हंगामी पैसेवारी तर १५ डिसेंबर रोजी अंतिम हंगामी पैसेवारी जाहीर होईल. त्यानंतर ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावात दुष्काळी स्थितीवर शिक्कामोर्तब होईल असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT