Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Mill : ‘संत तुकाराम’चा इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न

अध्यक्ष विदुरा नवले; ‘ए’ ग्रेड साखर निर्मितीसाठी काम

टीम ॲग्रोवन

मुळशी ः ‘‘संत तुकाराम साखर कारखान्याकडून (Sant Tukaram Sugar Mill) ९२ कोटी रुपये खर्चाचा इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारखाना ‘ए’ ग्रेड साखर निर्मितीसाठी (Sugar Production) प्रयत्न करत आहे,’’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले Vidura Nawle)यांनी दिली.

कारखान्याची ३३ वी वार्षिक सभा हिंजवडी (ता. मुळशी) येथे झाली. या वेळी उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे व अनिल लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी ठराव मांडले. ते एकमताने मंजूर झाले.

‘‘मुळशी व मावळ तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन कमी आहे. या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढवावे, तरच शेती परवडेल. उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्याने प्रशिक्षणाची सोय केली आहे, त्याचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन नवले यांनी केले

मागील थकबाकी २०० रुपये दिवाळीस द्यावी. सभासदांची उत्पादक व बिगर उत्पादक वर्गवारी करावी, अशी मागणी केली. भाऊसाहेब आवटे (ता. खेड) यांनी सर्व शेतकऱ्यांचा अपघाती विमा करावा, अशी मागणी माजी उपाध्यक्ष माऊली दाभाडे यांनी केली. तर, ‘‘ऊस तोडणी वेळेत करावी,’’ अशी मागणी ज्ञानेश्वर साठे (कोळवण) यांनी केली.

या शेतकऱ्यांचा सन्मान

हेक्टरी २६० टन ऊस उत्पादन घेतलेले शेतकरी वसंत गरडे (ता. मावळ) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, बाळासाहेब टोपे (राक्षेवाडी), गणपत आवटे (शेलगाव), बाजीराव दिघे (कोयाळी), सुभाष आरगडे (काळूस), गोरख शिवले (वढू बुद्रूक), शालन ढोकले (करंदी), संजय साबळे (सिद्धेगव्हाण), जालिंदर कोळेकर (कोयाळी), माणिक पवळे (कासारसाई), आत्माराम तापकीर (चऱ्होली बुद्रूक), संदीप पठारे (काळूस),

सविता साखरे (पाचाणे), संजय भेगडे (कुंडमळा), दत्तात्रेय सावंत (गोडुंब्रे), ज्ञानोबा जांभूळकर (हिंजवडी), मोहन भुमकर (पिंपळे जगताप), दिनारखेल हाजीबाझमुल (साळुंब्रे), दिनकर तापकीर (मुलखेड), कृष्णा दाभाडे (माळवाडी), परशुराम सातव (लवळे) यांना ऊस भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT