Sugar Mill : अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचडांची सत्ता गेली

मधुकर पिचड यांना अकोले (जि. नगर) येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. आमदार किरण लहामटे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर पाटील यांच्या समृद्धी शेतकरी विकास मंडळाला विधानसभेत आणि आता कारखान्याचीही पिचडांना सत्ता गमवावी लागली आहे.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

नगर ः महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केलेले माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar ZPichad) यांना अकोले (जि. नगर) येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या (Co-operative Sugar Mill) निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. आमदार किरण लहामटे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर पाटील यांच्या समृद्धी शेतकरी विकास मंडळाला विधानसभेत आणि आता कारखान्याचीही पिचडांना सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत स्वतः मधुकर पिचड यांच्यासह मुलगा वैभव यांचा दारुण पराभव झाला.

Sugar Mill
Sugar Export : साखर निर्यात धोरणास विलंब नको

अकोले तालुक्‍यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी या निवडणुकीत रंगत आली होती. माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपच्या शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व केले. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी पिचडांना ऐनवेळी साथ दिली.

Sugar Mill
Sugar Rate : देशांतर्गत बाजारात ऑक्टोबर मध्यापर्यंत समाधानकारक दराने साखरविक्री

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर पाटील, आमदार किरण लहामटे, अशोक भांगरे यांनी समृद्धी शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व केले. काही महिन्यांपूर्वी या निवडणुकीला ऐन मतदान होण्याच्या एक दिवस आधी स्थगिती आली होती. मात्र त्यानंतर परवानगी मिळाल्याने रविवारी (ता. २५) मतदान झाले आणि सोमवारी (ता. २६) मतमोजणी झाली.

Sugar Mill
Sugar Industry : साखर कारखाना कामगारांना थकीत वेतन मिळवून द्या

मतमोजणीनंतर हाती आलेल्या निकालानुसार पिचड यांच्या पॅनेलचा धक्कादायक पराभव झाला. स्वतः मधुकर पिचड यांचा अनुसूचित जाती-जमाती गटातून, तर चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड यांचाही इंदोरी गटात दारुण पराभव झाला.

Sugar Mill
Sugar Mills : गत हंगामातील महसूल विभागणी सूत्र यंदाच्या हंगामापूर्वीच निश्चित करा

विजयी उमेदवार असे ः अकोले गट ः मच्छिंद्र धुमाळ, विक्रम नवले, कैलास वाकचौरे, इंदोरी गट ः पाटीलबा किसन सावंत, अशोक भाऊसाहेब देशमुख, प्रदीप दत्तात्रय हासे, आगर गट ः अशोक आरोटे, परबत नाईकवाडी, विकास शेटे, कोतुळ गट ः मनोज देशमुख, यमाजी लहामटे, कैलास शेळके, देवठाण गट ः बादशहा बोंबले, रामनाथ वाकचौरे, सुधीर शेळके. महिला राखीव : सुलोचना अशोक नवले, शांताबाई दगडू वाकचौरे, अनुसूचित जाती जमाती : अशोकराव भांगरे. इतर मागास प्रवर्ग : मीननाथ पांडे, सोसायटी मतदार संघ : सीताराम गायकर

पराभवाचा तिसरा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक, अनेक वर्षे मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी मुलगा वैभव यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांच्या राजूर गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही पराभव झाला. अकोले तालुक्‍यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर पिचड यांची २८ वर्षांपासूनची सत्ताही राष्ट्रवादीने हिसकावली आहे. त्यामुळे त्यांना पराभवाचा तिसरा धक्का बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com