लातूर ः मराठवाड्यातील लातूरसह पाच जिल्ह्यांत सरासरी १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर रब्बी क्षेत्राच्या तुलनेत १५ लाख ५४ हजार १६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या ११४ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेल्या या क्षेत्रात हरभरा व करडईची सरासरीच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. हिंगोली वगळता इतर सर्व जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली
आहे.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी लातूरसह उस्मानाबाद परभणी हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये रब्बीचे सरासरी क्षेत्र, १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर आहे. त्या तुलनेत १५ लाख ५४ हजार १६३ हेक्टर म्हणजे सरासरीच्या ११४ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी रब्बी ज्वारीची सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ७४ टक्के, गव्हाची ८९ टक्के, मकाची ८६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुसरीकडे हरभरा पिकाची सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १३८ टक्के क्षेत्रावर तर करडईची पहिल्यांदा सरासरीच्या तुलनेत १२४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई ही सर्वच पिके सद्यःस्थितीत वाढीच्या अवस्थेत आहेत.
गव्हाचे पीक मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत असून हरभऱ्याचे पीक फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी हरभरा पिकावर अल्प प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सरासरीच्या पुढे जाऊन पेरणी झालेल्या करडई पिकावर काही प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
जिल्हानिहाय सरासरी व प्रत्यक्ष
पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी
लातूर २८०४३७ ३६६९२२ १३१
उस्मानाबाद ४१११७२ ४२१९४६ १०३
नांदेड २२४६३४ ३२३६०९ १४४
परभणी २७०७९५ २८५६३४ १०५
हिंगोली १७६८९३ १५६०५२ . ८८
विभागातील पिकांचे सरासरी व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी
रब्बी ज्वारी ३७१८५७ २७४५४२
गहू १५६५१९ १३९९५५
हरभरा ७८६१२४ १०८७५८३
मका १७९७१ १५५२२
करडई १९५३१ २४२८६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.