Chana Sowing : नांदेडमध्ये सव्वादोन लाख हेक्टरवर हरभरा पेरणी

यंदा पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या १३० टक्के झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यात यंदा रब्बी पेरणीला वेग आला आहे.
Chana Sowing
Chana SowingAgrowon
Published on
Updated on

नांदेड : यंदा पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या १३० टक्के झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यात यंदा रब्बी पेरणीला (Rabi Sowing) वेग आला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात पावणेतीन हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. यात तब्बल सव्वादोन लाख हेक्टरवर हरभरा पेरला (Chana Sowing) आहे. गव्हाचे पेरणी (wheat Sowing) क्षेत्र यंदा वाढण्याचा अंदाज असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

Chana Sowing
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पाच महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३० टक्के पाऊस झाला आहे. यापावसामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पासह कोल्हापुरी बंधारे, उच्च पातळी बंधाऱ्यात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. परिणामी, जमिनीतील जलस्रोत बळकट झाल्याने रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होत आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर आहे.

या तुलनेत आतापर्यंत १२० टक्क्यांनुसार दोन लाख ७० हजार ११२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख २१ हजार २०८ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. यासोबतच गहू २३ हजार ५९७ हेक्टर, रब्बी ज्वारी १६ हजार ५४५ हेक्टर, करडई चार हजार २३२ हेक्टर, रब्बी मका चार हजार ३२५ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

यंदा गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ जिल्ह्यात रब्बीसाठी जमिनीत चांगला ओलावा असल्यामुळे मागील वर्षा प्रमाणे यंदाही हरभरा सर्वाधिक क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता आहे. यासोबतच या वर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रातही यंदा लक्षणीय वाढ दिसत आहे.

- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

Chana Sowing
Chana Market : विदर्भ ठरतोय हरभरा उलाढालीचे केंद्र

रब्बीमधील नियोजित पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) ः

हरभरा दोन लाख २१ हजार २०८ हेक्टर

गहू २३ हजार ५९७ हेक्टर

रब्बी ज्वारी १६ हजार ५४५ हेक्टर

रब्बी मका चार हजार ३२५ हेक्टर

करडई चार हजार २३२ हेक्टर

एकूण दोन लाख ७० हजार ११२ हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com