Nagpur News  Agrowon
ताज्या बातम्या

Pesticide Awareness : कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी जागृती मोहीम सुरु

Kharif Season : कीटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागातर्फे परभणी जिल्ह्यात ४५ दिवस सुरक्षित फवारणी जागृती मोहीम राबविला जात आहे.

Team Agrowon

Nagpur News : कीटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागातर्फे परभणी जिल्ह्यात ४५ दिवस सुरक्षित फवारणी जागृती मोहीम राबविला जात आहे.

या मोहिमेच्या प्रचार रथाचे उद्घाटन गुरुवारी (ता. ३) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले, कृषी अधिकारी कैलास गायकवाड, सिनजेंटा कंपनीचे आमले आदी उपस्थित होते.

कीटकनाशकांची फवारणी करतांना योग्य काळजी घेतली नाही तर विषबाधा होऊ शकते.त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतेवेळी दक्षता घेण्याची नितांत गरज आहे.

कृषी विभाग व सिनजेंटा कंपनी यांच्यातर्फे जिल्हाभरात सुरक्षित फवारणी मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत ४५ दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांमध्ये प्रचार रथाव्दारे जागृती केली जात, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT