Pesticide Use : रासायनिक कीटकनाशकांच्या वापरात राज्य आघाडीवर

Pesticide Ban : देशात तेलंगणा, पंजाब, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने कीटकनाशकांच्या वापरात आघाडी घेतली आहे.
Pesticide
Pesticide Agrowon
Published on
Updated on

Pune News : देशात तेलंगणा, पंजाब, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने कीटकनाशकांच्या वापरात आघाडी घेतली आहे. शास्त्रज्ञांच्या मते कीटकनाशकांचा वाढता वापर ही नकारात्मक बाब असली, तरी वाढत्या नगदी व काटेकोर शेतीमुळे वाढता वापर अपरिहार्य आहे.

ईशान्य भारतातील राज्ये कीटकनाशकांचा सर्वांत कमी वापर करतात. मात्र ही राज्ये सोडून उर्वरित भारताचा विचार करता महाराष्ट्रामधील कीटकनाशकांची विक्री सर्वाधिक आहे.

२०१८ च्या आधी प्रतिवर्षी १५ ते १६ हजार टनांच्या आसपास राज्यात कीटकनाशकांचा वापर केला जात होता. त्यानंतर मात्र नैसर्गिक शेती, निर्यातक्षम शेती तसेच आरोग्यदायी आहार या संकल्पना रुजल्या आणि कीटकनाशकांचा वापर जवळपास दोन ते दीड हजार टनाने घटला.

सध्या गेल्या तीन वर्षांपासून राज्यात १२ ते १३ हजार टन कीटकनाशकांची विक्री होत आहे. विशेष म्हणजे कोरोना कालावधीत देखील यात घट झालेला नाही. त्यामुळे सध्या राज्यात होणारा कीटकनाशकांचा वापर हा गरजेपुरता व अपरिहार्य असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

Pesticide
Pesticide Selling Licence : कीटकनाशके विक्रेत्याच्या मृत्यूनंतर परवान्याचे हस्तांतर

निविष्ठा वापरात पंजाबचे नाव सतत घेतले जाते. परंतु पंजाबमधील कीटकनाशकांचा प्रतिवर्षी वापर पाच हजार टनांवर स्थिरावला आहे. उत्तर प्रदेशमधील शेतीलायक जमीन ही देशात सर्वांत मोठी समजली जाते. परंतु तेथेही कीटकनाशकांचा वापर महाराष्ट्रापेक्षा कमी होत असल्याचे दिसून येते.

उत्तराखंड, गोवा, मध्य प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश आणि बिहार ही राज्ये सर्वांत कमी कीटकनाशकांचा वापर करतात. मध्य प्रदेश व बिहारसारखी मोठी राज्ये वर्षाकाठी केवळ ५०० ते ६०० टन कीटकनाशके वापरत असल्याचे केंद्रीय आकडेवारीतून स्पष्ट होते.

महाराष्ट्रात ४२ लाख हेक्टरवर कपाशीचे घेतली जाते. ४१ लाख हेक्टरवर सोयाबीन पिकवले जाते. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर वाढतो. याशिवाय भाजीपाला व फळबागांमुळे कीटकनाशकांचा वापर अपरिहार्य ठरतो. ‘‘हवामान बदल हाच मुख्य घटक कीटकनाशकांच्या वापराशी मुळाशी आहे.

Pesticide
Biological Pesticides : जैविक कीटकनाशकांचे शास्त्र, कार्यपद्धती जाणून घेणे गरजेचे

अवकाळी पाऊस आल्यास कीड-रोग वाढतात. त्यामुळे कीटकनाशकांची विक्रीदेखील वाढते. नाशिक भागात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये एक पाऊस झाल्यास बाजारात ४८ तासांत किमान ३ ते ५ कोटी रुपयांची कीटकनाशके विकली जातात,’’ अशी माहिती एका शास्त्रज्ञाने दिली.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कीटकनाशकांचा होणारा जादा वापर हा काहीसा नकारात्मक मुद्दा वरकरणी वाटतो आहे. पण शेतकरी व्यावसायिक व काटेकोर शेतीकडे झुकत असल्याचेही ते एक लक्षण आहे. भाजीपाला, फलोत्पादन, सोयाबीन, कापूस उत्पादनात राज्याने घेतलेली झेप नेत्रदीपक आहे. त्यासाठी कीटकनाशकांचा मर्यादित वापर योग्यच ठरतो.
- डॉ. एस. डी. सावंत, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
कीटकनाशकांच्या वापराबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. राज्यात कृषी सेवा केंद्रांच्या सल्ल्यानुसार मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होतो. परंतु शेतकऱ्यांनी स्वतः कीड-रोगाचा अभ्यास करायला हवा. कोणत्याही पिकात आधी एकात्मिक कीड नियंत्रण उपयुक्त ठरते. त्यानंतर अगदी गरज असेल तरच रासायनिक कीटकनाशकांचा मर्यादित वापर करायला हवा.
- विकास पाटील, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, कृषी आयुक्तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com