Rahibai Popere
Rahibai Popere Agrowon
ताज्या बातम्या

Rahibai Popere : राहीबाईंनी दिल्लीत मांडल्या ग्रामीण समस्या

टीम ॲग्रोवन

नगर : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) ‘महिलांचा विकास प्रक्रियेतील सहभाग आणि भूमिका’ या विषयावर नुकतीच राष्ट्रीय परिषद झाली. या तीन दिवसीय परिषदेमध्ये पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. परिषदेमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्‍वत विकास साधताना आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी विकासातील महिलांचा सहभाग व भूमिका, याविषयी मंथन करण्यात आले.

राहीबाई म्हणाल्या, की देशी बियाणे वाचले पाहिजे. ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी शासनाने राष्ट्रीय पातळीवर ठोस उपाययोजना कराव्यात. ग्रामीण आणि आदिवासी भागातील छोट्या शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे काम उभे करावे लागणार आहे. ग्रामीण भागातील शेतीच्या समस्या मोठ्या आहेत. आजही छोटे शेतकरी यांत्रिक शेतीपासून कोसो दूर आहेत.

पारंपरिक पद्धतीने शेती करताना अनंत अडचणी येतात. मजूर मिळत नाहीत, यांत्रिक साधने गावात उपलब्ध नसल्याने छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. तरुण पिढी पडेल ते काम करते, परंतु शेतीकडे फिरण्यास तयार नाही. यातून मोठी समस्या निर्माण होणार आहेत. शेतकरी सोप्या व कमी कष्टाच्या पिकांच्या मागे लागला आहे. शेतीमधील पिकांची विविधता कमी होणे म्हणजे आपल्या ताटातील सकस अन्न कमी होणे, हे समजून घेतले पाहिजे.

यातील आरोग्याच्या गुंतागुंतीच्या अनेक समस्या निर्माण होणार आहेत. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी देशातील जनतेचे आरोग्य जपावे लागणार आहे. वीज, पाणी, शेतीसाठी लागणारी अपुरी साधने, बदलते हवामान, शेतीमालाला मिळणारा बाजारभाव या प्रमुख समस्या देशातील शेतकऱ्यांसमोर आहेत.

तीनदिवसीय परिषद

राष्ट्रीय पातळीवरील या कार्यक्रमाचे आयोजन २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये करण्यात आले होते. पद्मश्री राहीबाई यांना या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी खास निमंत्रित करण्यात आले होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व महिलांच्या विकासासाठी देशपातळीवर चळवळ उभी करणाऱ्या शक्ती या फोरमतर्फे उन्नत भारत अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राहीबाई यांनी कृषीवर आधारित उभे केलेले काम सविस्तरपणे मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT