Rahibai Popere : अतिवृष्टीतही राहीबाईंनी जपला बियाणे प्लॉट

नगर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने पिकांना सर्वत्र फटका बसला आहे. बहुतेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते.
Rahibai Popere
Rahibai Popereagrowon
Published on
Updated on

नगर : नगर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने (Heavy Rain) पिकांना सर्वत्र फटका बसला आहे. बहुतेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट (Resowing Crisis) ओढवले होते. यातून काही शेतकरी (Farmer) सावरले, तर काही जमीनदोस्त झाले. अशीच काहीशी परिस्थिती बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांच्यावरसुद्धा ओढवली होती. अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) तीन वेळा लागवड करून बियाणे जोपासत अतिवृष्टीवरही मात केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Rahibai Popere
Crop Damage Compensation : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीअभावी मदतच मिळेना

नगर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अकोले तालुक्याचा पश्‍चिम आदिवासी भागात तर कायम पावसाचा. या भागात सातत्याने पाऊस पडतो. मात्र अन्य भागात अतिवृष्टी झाल्यास या भागात अतिजोरदार पाऊस पडतो. यंदा या भागातील शेतकऱ्यांनी अतिजोरदार पाऊस अनुभवला आणि त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीचा कोंभाळणे (ता. अकोले) येथील बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीजोत्पादनालाही जोरदार फटका बसला बसला.

दरवर्षी त्या देशी बियाणांचे बrजोत्पादन घेतात. मात्र यंदा पावसामुळे नुकसान झाल्याने बियाणे प्लॉटवर तीन वेळा लागवड करावी लागली. राहीबाई यांनीही हार न मानता बियाणे प्लॉट जोपासलाच. चालू हंगामात बियाणे तयार होणार नाही, अशीच काहीशी परिस्थिती होती. निराश न होता त्यांनी घरातील सदस्यांना बरोबर घेत पुन्हा एकदा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली.

Rahibai Popere
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

कारली, दोडका, घोसाळी, वाल, चंदन बटवा, मिरची, टोमॅटो, वांगी, डांगर भोपळा, दुधी भोपळा, काकडी, खरबूज अशा विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या अस्सल वाणांची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखविली आहे. राहीबाई म्हणाल्या, की कळसूबाई परिसर बियाणेसंवर्धन सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली आहे. ‘बायफ’ या आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने ही संस्था आदिवासी भागातील सुमारे ५० गावांमध्ये कार्यरत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी देशी बियाण्यांकडे वळून शेती समृद्ध करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com