Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : सर्वदूर पावसाने पिकांना संजीवनी

Latest Rain Update : राज्यात महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर गुरुवारी (ता. ७) सायंकाळपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Pune News : राज्यात महिनाभराच्या दीर्घ खंडानंतर गुरुवारी (ता. ७) सायंकाळपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. अखेरची घटका मोजत असलेल्या खरिपाच्या पिकांना काहीसा आधार मिळाला आहे.

मात्र काही ठिकाणी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा असून कमीअधिक पावसाने पिकांना काही प्रमाणात नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे कोमेजलेली पिके चांगलीच तरारली आहेत.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरीच्या काही भागांत दमदार पाऊस पडला. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या जोरदार पडत आहेत. वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत पावसाचा जोर अधिक असून शुक्रवारी (ता. ८) सकाळपासून सर्वत्र पाऊस सुरू होता. या पावसामुळे भातपिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.

दुपारपर्यंत पडलेल्या पावसामुळे होरपळलेली भातशेती हिरवीगार झाली असून शिवारात पाणी साचले आहे. उन्हाच्या कडाक्यात भात करपून जाण्याच्या भीतीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा पावसाने आगमन केले आहे.

मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, नाशिक भागांत पावसाच्या अनेक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. नगरमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी पिकांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत.

अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत हलक्या सरी बरसल्या तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. खानदेशात पावसाच्या बऱ्यापैकी सरी कोसळल्याने कापूस, तूर पिके टवटवीत झाली आहे.

मराठवाड्यात प्रदीर्घ खंडानंतर सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. तीन जिल्ह्यांतील ९ मंडळांत अतिवृष्टी झाली. बहुतांश मंडळांत पावसाची हजेरी तुरळक, हलक्या स्वरुपाची होती. दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक भागात पावसाची अधूनमधून हजेरी कायम होती. नांदेड, लातूर, धाराशीव, बीड भागांत बऱ्यापैकी पाऊस पडला.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी दहा पर्यंतच्या २४ तासांमध्ये ८२ मंडळात हलका ते जोरदार पाऊस झाला. परिणामी कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही भागात २२, तर काही भागात ३० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती.

त्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकांना दिलासा देणारा हा पाऊस आहे. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाला. तर अकोला जिल्ह्यातही काही भागात पावसाने हजेरी दिली. कोमेजत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी ठरणारा पाऊस झाला आहे.

शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली मंडळे

भाईंदर १०५, धसइ १४९.३, नयाहडी १०४, अंगाव, डिघशी १३४, शहापूर १०९, खर्डी १४९, किनहवळी ११५, वसींड १०९, डोळखांब ११५, उल्हासनगर ११४, अंबरनाथ ११४, मार्गताम्हाणे १०२, गुहागर १२८, तळवली ११३, पाटपन्हाळे १२७, दहादेवडी ११७.५, आंबेगाव १४३.

राज्यात शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला मंडळनिहाय पाऊस (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण :

ठाणे ६५.३, बलकुम ७३.८, मुंब्रा ६५, दहिसर, बेलापूर ९१, कल्याण ९३, अप्पर ९१, टिटवाळा ९२, ठाकुर्ली ८६, नडगांव ८९, देहरी ९२, सरळगाव ९७, भिवंडी ८९.८, अप्पर भिवंडी ८२, पडघा ८९.५, खारबाव ७३.८, गोरेगाव ७७, कुमभर्ली ९१, बदलापूर ८४, पनवेल ७७.८, पवयंजे ७८.८, कर्नाळा ७२, तळोजे ९१.८, मोराबी ८१.५, कर्जत ९२.८, नेरळ ९०, कडाव ८१.३, कळंब ८३.८, कशेले ७३.८, चौक ९२.८, खोपोली ९२.८, नाटे ६९, म्हसला, खामगाव ६७, वहाळ ५४, दापोली ७५, बुरोंडी ७५, दाभोळ ९०, आंजर्ले ७५, वाकवली ६६, वेळवी ७५, खेड ६६.३, भरणे ५४.५, आबलोली ६९, मंडणगड ५४.८, म्हाप्रळ, देव्हारे ५७.५, पावस ८७.८, साटवली ५३, देवगड ६८.३, पडेल ६७.८, मीठबाव ५०, शिरगाव ४८.

मध्य महाराष्ट्र :

नवी बेज ७५, मोकभणगी ७३, कनाशी ५४, दळवट ८६, अभोणा ६८, उंबरठाणा ७८.५, बोरगाव ८६.५, सुरगाणा ७८.५, ननाशी ५३.३, इगतपुरी ७८.३, वाडीवऱ्हे ६६.५, धारगाव ८६.८, त्र्यंबकेश्वर ७४.५, वेळुंजे १०४, हरसूल ६५.५, देवळा ८५.५, होळनांथे ८०, सांगवी ४२, बेटावद ४४.५, तोरणमाळ ४५.५, अमळनेर ९१.५, शिरूड ७१.३, पातोंडा ४३.३, मारवड ८०, नगाव ६७.८, अमळगाव ५०, भरवस ६५.३, वावडे ५६, पारोळा ९६.३, शेळावे ८५, तामसवाडी ८५, चोरवड ६७, बहाळ ९३, नांद्रा ७६, नगरदेवळा ९७, गाळण ७०, भडगाव ८१, कजगाव ७५, कोळगाव ७८, सोनवद ७२, कार्ला ७९.५, लोणावळा ८६.५, शिवणे ४३.८, जुन्नर ६८, नारायणगाव ६६, राजूर ८०, डिंगोरे ८७, आपटाळे ८२, ओतूर ६८, महाबळेश्वर ५३.५.

मराठवाडा :

चौका ६८.५, नागड ५४, आमथना ६८, आंबाई ६८, बोरगाव ५४, जरांडी ७०, बनोती ५४, फुलंब्री ६८, नेर, शेवाळी ८०, शेळगाव ५६, पांगरी ८०.८, आदमपूर ६७.३, माजंरम ४६.८, डिग्रस कऱ्हाळे ८२.८, नांदापूर ६७, येहळेगाव ८८.८, सेनगाव ५०.८, साखरा ८४, पानकनेरगाव ५०, हत्ता ९१.३.

विदर्भ :

तुळजापूर ४८, सिंदखेड ५६, लोणार ५०, हिरडव ६७.८, आष्टी ५२, धानोरा ६५.५, अमळा ४६.५, कुऱ्हा ५०.३, पिंपळगाव ७६.८, सावरगाव ६७.८, अर्नी ६५.३, उमरखेड ५५.५, कुपटी ५५.५, पांढरकवडा ४०, पहापळ ६८.५, घोटी ६६, धानोरा ६५, सेवाग्राम ५५.५, शिंदी ६७.८, धारगाव ७६.८, सावर्ला ७४.८, लाखांदूर ५२, मुरमाडी तूप ६५.३, अर्जुनी मोरगाव ९५.३, चिकणी ६५.८, चिमूर ६५.५, शंकरपूर ८८.८, गांभूळघाट ६५.५, येवळी ८३.५, पेंढरी ५७, करवाफा ७६.३, शंकरपूर ७२.८, तरडगाव ७१.३, भामरागड ७७.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT