Marathwada Rain Update : मराठवाड्यात पाच जिल्ह्यांतील बहुतांश भागांत पावसाची हजेरी

Latest Rain Update : पावसाच्या प्रदीर्घ खंडाने पिकांची प्रचंड होरपळ केली आहे. अशातच बुधवारी (ता. ७)सायंकाळपासून पाऊस सक्रिय होण्याची चिन्ह दिसत आहेत.
Marathwada Rain
Marathwada RainAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यातील बहुतांश मंडलांमध्ये गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची तुरळक, हलकी, मध्यम हजेरी लागली.

बहुतांश मंडलात केवळ खंड तोडण्यापुरता हजेरी लावणारा हा पाऊस अनेक भागात गुरुवारी दुपारपर्यंत अधून मधून रिमझिम बरसत होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावलदबारा या मंडलात अतिवृष्टी झाली.

पावसाच्या प्रदीर्घ खंडाने पिकांची प्रचंड होरपळ केली आहे. अशातच बुधवारी (ता. ७)सायंकाळपासून पाऊस सक्रिय होण्याची चिन्ह दिसत आहेत. अर्थात प्रदीर्घ खंडाने मोठी झळ बसलेल्या हलक्या व मध्यम जमिनीतील पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालेच असे नाही. त्यामुळे यंदाचा खरीप प्रचंड संकटात आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ८४ मंडलात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. जिल्ह्यातील ३० मंडलात २० ते ४० मिलिमीटर दरम्यान तर ९ मंडलात ४० ते ५८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

Marathwada Rain
Rain Update : अकोला, वाशीममध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस

खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, पैठण, वैजापूर आदी तालुक्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. सर्वदूर तुरळक, हलका, मध्यम झालेला हा पाऊस सावलदवारा मंडलात ६९ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टी रुपात बरसला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४८ मंडलात पावसाची हजेरी तुरळक, हलक्या स्वरूपाची होती. जिल्ह्यातील सहा मंडलात २० ते २६ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

Marathwada Rain
Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता

बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडलात पावसाची हजेरी तुरळक, हलक्या स्वरूपाची राहिली. जिल्ह्यातील १४ मंडलात १० ते १८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात सर्व ६० मंडलात तुरळक, हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील १६ मंडलात १० ते २९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाल्याची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश मंडलात पावसाची हजेरी तुरळकच राहिली. जिल्ह्यातील ४२ पैकी ३८ मंडलात झालेला पाऊस तुरळक, हलक्या स्वरूपाचा होता.

जिल्हा व मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर २२.५, उस्मानपुरा ३३.५, कांचनवाडी २६, कचनेर २५, पिंपळवाडी ३२.५, बालानगर २१.५ लोहगाव २१.८ ढोलकी ४२.३ बिडकीन ५६.३, विहामांडवा २०.५, निलजगाव ४४.३, शेंदूरवादा २६, तुर्काबाद ४०.५, वाळूज ५०. ८,हरसुल ३६.३, डोणगाव ५८, आसेगाव ३०, गाजगाव २१.३, खंडाळा ३१.८, शिऊर ३४.८, बोरसर ३१.८, लोणी ५०.८, गारज ४४.८, लासुरगाव २९.५, घायगाव २१.३, जानेफळ २४.५, देवगाव २९.८, वेरूळ ३४, बाजार सांगवी २७.८, सिल्लोड २२.८, भराडी २२.८, गोळेगाव २५.५, अजिंठा ३६.८, अंबई ४०, पालोद ३६, शिवना ३५.३, उंडणगाव ३३, सोयगाव ४६.५, जरंडी २७.

जालना जिल्हा : भोकरदन २१.८, धावडा २७.३, अनवा ५३.३, पिंपळगाव २६, कुंभारझरी २०.५, तीर्थपुरी २१, कुंभार पिंपळगाव २१.३.

बीड जिल्हा : पाटोदा २८, बर्दापूर १६, केज १६.८, विडा १८, धारूर १८.८.

लातूर जिल्हा : कासारखेडा २९.३, किनी २६.८, निलंगा १७.५, पानचिंचोली २०.८, कासार बालकुंदा १५.८, अंबुलगा १६.८, नळगीर २३.५, नालेगाव १६.३, कोरेगाव १४.८, बोरोळ २८.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com