Sangli DCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : थकीत कर्जदारांसाठी ओटीएस योजना पुन्हा सुरु करा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Farmer loan : थकीत कर्जदारांसाठी ओटीएस योजना पुन्हा सुरु करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली जिल्हा बॅंकेकडे केली आहे.

Team Agrowon

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने थकित कर्जदारांसाठी लाभदायक असणारी ‘ओटीएस’ योजना सध्या बंद केली आहे. ती पुन्हा एक वर्ष चालू ठेवावी. तसेच सोसायट्यांना ही आर्थिक मदत करावी,’’ अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली.

जिल्हा बँकेचे व्यवस्थापक सतीश सावंत, संचालक वैभव शिंदे यांना दिलेल्या निवेदनानुसार, तीन वर्षांपूर्वी ‘स्वाभिमानी’ने आंदोलन करून ‘ओटीएस’ योजना सुरू करायला भाग पाडले होते. या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना झाला. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज भरणा केला आहे. बँकेची वसुली ही चांगली झाली आहे. यामुळे बँकेचा एनपीए कमी झाला आहे. एकंदरीत बँक आणि शेतकऱ्यांच्या हिताची ही योजना आहे. त्यामुळे ही योजना आणखी वर्षभर सुरू ठेवावी. त्याचबरोबर कर्ज वसुली करताना कर्जाच्या व्याज वसुलीत तफावत आहे. त्यामुळे सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. सोसायट्यांना आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा बँकेने घ्यावी. या मागण्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करून घ्याव्यात, असे निवेदनात नमूद आहे.

निवेदनावर, संजय बेले, संजय खोलखुबे, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, भागवत जाधव, अभिजित पाटील, विक्रम शेडबाले, महेश संकपाळ, दीपक मगदूम, दस्तगीर मुजावर, सागर बिरनाळे, सुरेश पाचीब्रे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Reservoir Storage : देशातील जलशयात पाणीसाठ्यात झपाट्याने घट; राज्यात प्रमुख जलशयात ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Power Tiller Care: पॉवर टिलरची देखभाल कशी करावी?

Kannad Naksha Project: कन्नड नक्शा प्रकल्पाचे काम पूर्ण

Maize Prices Crash: मक्याचा दर हमीभावाच्या खाली, तेलंगणातील शेतकरी अडचणीत, सरकारकडे मदतीची मागणी

Fertilizer Supply: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २ लाख ९२ हजार टन खत पुरवठा मंजूर

SCROLL FOR NEXT