Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीक नुकसानीबाबत विमा कंपनीला कळवा

टीम ॲग्रोवन

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई (Crop Insurance) मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस ७२ तासांमध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Abhijeet Raut)व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे (Ravishankar Chalwade) यांनी केले आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्‍चित करण्यात येते.

या जोखिमेअंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पाणी ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अत्यावश्यक आहे.

तक्रार असल्यास संपर्क करा...

पीकविमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून (क्रॉप इन्शुरन्स) हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा १८००१०३५४९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कंपनीच्या पत्त्यावर ई- मेलवर नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकियो विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषी सहायक यांच्याकडे ऑफलाइन अर्ज सादर करू शकतील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अभिजित राऊतदे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dried Fish Rate : कोकणात मागणीमुळे सुक्या मासळीचे दर वधारले

Oilseeds Research Award : ‘पंदेकृवि’च्या तेलबिया संशोधन केंद्राला पुरस्कार

Crop Damage : मराठवाड्यात नऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Jamun Production : जांभळाच्या उत्पादनात घट

India Monsoon : मॉन्सूनची वेळेत वर्दी

SCROLL FOR NEXT