Land Acquisition Agrowon
ताज्या बातम्या

Land Acquisition : सुरत-चेन्नईच्या वैराग ट्रम्पेटसाठी चौरस मीटर दराने मोबदला

Surat Chennai Highway : सूरत -चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी वैराग येथील ट्रम्पेटसाठी लागणारी जमीन चौरस मीटर दराने संपादित करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : सूरत -चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी वैराग येथील ट्रम्पेटसाठी लागणारी जमीन चौरस मीटर दराने संपादित करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे. यावर ७ ऑक्टोबरपूर्वी निर्णय होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत व वैराग येथील दहा गटातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली.

बैठकीत वैराग येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी हेक्टरप्रमाणे दर न देता चौरस मीटरने दर आकारण्याची मागणी केली. आमदार राजेंद्र राऊत यांनीही यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्यात सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सूरत-चेन्नई महामार्गाच्या कामाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे.

यासाठी गतीने भूसंपादनही करण्यात येत आहे. बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी संपादित करण्यात येत आहेत. सूरत-चेन्नई महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीस सदोष पद्धतीने कमी

दर देण्यात येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी भूसंपादनासाठी आलेला मोबदला नाकारून भूसंपादनास विरोध करीत आहेत.

गावठाण जमिनीला मिळतो शेतीचादर

बार्शी तालुक्यातील वैराग, लक्ष्याची वाडी तसेच अक्कलकोट तालुक्यातील नागणहळ्ळी व उमरगे येथील शेतकऱ्यांच्या गावठाण जमिनीही शेतीच्या दराने संपादित करण्यात येत आहेत. त्यामुळे कमी दर मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

‘पीएमओ’चे तपासणी पथक येणार

शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी देण्यात येणारा दर चुकीच्या पद्धतीने देण्यात येत असून दरवाढीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे तातडीने सादर करण्यात यावा, अशी सूचना यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत तातडीने दरवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्याचा निर्णय यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला. नवा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील तपासणी पथक सोलापूरला येईल. ७ ऑक्टोबरपूर्वी हा विषय मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: तीन तास वादळी चर्चा, सरकारकडून रेटारेटी अन् निर्णय...; नेमकी किती होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी?

Crop Damage : रब्बी पेरणी, कपाशी, भाजीपाल्याला पावसाचा फटका

Water Conservation : वनरक्षणासोबतच जलसंवर्धनासाठीही धडपड

Buffalo Breeding : म्हशींमधील प्रजनन व्यवस्थापनाचे नियोजन

Smart Village : कुंभारी झाले सुंदर, पर्यावरणपूरक हरितग्राम

SCROLL FOR NEXT