Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation : वाया जाणारे पाणी डावा कालव्यातून तलावात सोडा

अंजना पळशी मध्यम प्रकल्पाव्यातून वाया जाणारे पाणी डावा कालव्याद्वारे पाझर तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : अंजना पळशी मध्यम प्रकल्पाव्यातून (Irrigation) वाया जाणारे पाणी डावा कालव्याद्वारे (Canal Water) पाझर तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात गोदावरी पाटबंधारे महामंडळ व जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी (ता. २१) निवेदन देण्यात आले.

यंदा अंजना पळशी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. २०११ मध्ये डावा कालव्यातून पाणी सोडून नाचनवेल चिच खोरी पाझर तलाव भरला होता.

त्यामुळे नाचनवेल, आमदाबाद शिवारातील लाभ क्षेत्रातील शेकडो एकर क्षेत्र सिंचनाखाली आले होते. त्याचप्रमाणे यंदाही कालव्यातून पाणी सोडून नाचनवेल चिच खोरी पाझर तलाव व आमदाबाद, पाझर तलाव भरून दिला तर नाचनवेल आमदाबाद, मोहाडी, लाभक्षेत्र शिवारातील शेतजमीनसी सिंचनाखाली येईल. रब्बी पिकाला व जनवरांना पिण्यासाठीच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असे निवेदनकर्त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

डावा कालव्याची दुरुस्ती करा

डावा कालवा दुरुस्ती करून कीमान तीन अवतरण पाणी नियमितपणे मिळावे. यासंबंधी अनेक वेळा निवेदन दिले आहे. या कालव्यातून मोठी झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे त्याची सफाई करणे व कालव्याची गळती बंद करणे आदी कामे तातडीने करावीत. जमीन क्षेत्र कमांड एरिया लाभक्षेत्र असल्यामुळे जमीन खरीदी-विक्री जास्तीचा मुद्रांक भुर्दंड बसतो; मात्र या पाण्याचा लाभ नियमित मिळत नाही त्यामुळे याविषयी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT