मुंबई ः भारतामध्ये नेटाफिम इरिगेशन (इंडिया) (Netafim Irrigation India) ही कंपनी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असून आजपर्यंत सुमारे २८ लाख एकराहून अधिक क्षेत्रावर कंपनीची ठिबक सिंचन यंत्रणा (Drip irrigation system) कार्यरत आहे. कंपनीकडून महाराष्ट्रातील ऊस क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर वाढण्यासाठी काही साखर कारखान्यांशी (Sugar Mill) करारनामा करून तसेच शेती व ऊस विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यांना प्रशिक्षण देऊन एक लाख सत्तर हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नेटाफिम ठिबक संच यशस्वीपणे कार्यरत आहेत.
पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर होऊन ऊस उत्पादनात ३० ते ३५ टक्के हमखास वाढ झालेली आहे. राज्यातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील असून अल्पभूधारक शेतकऱ्यास ८० टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येत आहे.
ठिबक सिंचनाचा वापर करून राज्यातील हजारो शेतकरी उसाचे एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. नेटाफिम इरिगेशन सबसरफेस ड्रीप आणि डबल ड्रीपलाईनचा वापर ऊस पिकामध्ये वाढण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.
त्याचप्रमाणे स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा (डिजिटल फार्मिंग सोल्यूशन) वापर मोठ्या ऊस लागवड क्षेत्रावर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. राज्यात ३०० हून अधिक स्वयंचलित ठिबक सिंचन युनिट्स ऊस पिकामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.