Government Scheme
Government SchemeAgrowon

Irrigation Scheme : आष्टी उपसा योजनेच्या निधीसाठी कालव्यात ठिय्या

आंदोलनाची दखल घेता येत नसेल, निधी देता येत नसेल, तर आता आम्हाला याच खड्ड्यात बुजवून टाका, अशा शब्दांत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
Published on

सोलापूर ः आष्टी उपसा सिंचन योजनेला (Ashti Upsa Irrigation Scheme) निधी देण्याच्या मागणीसाठी पाटकूल (ता. मोहोळ) येथे या योजनेच्या कालव्याच्या चाळीस फूट खड्ड्यात गेल्या आठ दिवसांपासून जनहित शेतकरी संघटनेच्या (Janhit Shetkari Sanghtna) वतीने सुरू असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. १८) आठव्या दिवशीही सुरूच होते. आंदोलनाची दखल घेता येत नसेल, निधी देता येत नसेल, तर आता आम्हाला याच खड्ड्यात बुजवून टाका, अशा शब्दांत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

Government Scheme
Swabhimani Shetkari Sanghtna : ‘स्वाभिमानी’च्या गस्त पथकाकडून आले जप्त

गेल्या आठ दिवसांपासून ऊन-पाऊस, वारा झेलत हे आंदोलन सुरू आहे. पण अधिकाऱ्यांना त्यासाठी वेळ मिळत नाही, ही आमची शोकांतिका आहे, असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, की मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना गेल्या २६ वर्षांपासून रखडत पडलेली आहे. त्या कामाला त्वरित सुरवात करावी, ही आमची मागणी आहे.

आष्टी योजनेसह जिल्ह्यातल्या अनेक बार्शी, मंगळवेढा, करमाळा, अक्कलकोट सिंचन योजना रखडत पडल्या आहेत. या आंदोलनात नाना मोरे, कुमार गोडसे, नितीन जरग, बारीकराव काळे, अरविंद काळे, दिलीप काळे, प्रकाश महाजन, उस्मान आतार, अण्णा शेटे आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.

आंदोलनातील अन्य मागण्या...

पाटकूल, पेनूर, कोन्हेरी, बैरागवाडी, मोडनिंब व इतर सिंचन योजनेतील शेतकऱ्यांचा संपादित जमिनीचा व फळबागांचा मोबदला त्वरित द्यावा.

आष्टी उपसामध्ये हिवरे, वडाचीवाडी, चिखली, यावली व आढेगावचा व सीना-माढा सिंचन योजनेत वाफळे, देवडी, तेलंगवाडी, अनगर व अनगरवाड्यांचा समावेश करावा.

कालव्याच्या काँक्रीट करण्याच्या कामाला सुरुवात करून कालव्याची लेव्हल करावी.

जोपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेतली जाणार नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. भलेही तुम्हाला मार्ग काढता येत नसेल, तर याच कालव्याच्या खड्ड्यातच आम्हाला बुजवा. पण आता माघार घेणार नाही.

- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com