Orchard  Agrowon
ताज्या बातम्या

Horticulture : निर्यातक्षम फळबागांची ‘हॉर्टनेट’वर करा नोंदणी

निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज व आपल्या प्लॉटची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

Team Agrowon

सोलापूर : निर्यातक्षम फळे (Fruits) व भाजीपाला उत्पादन (Vegetable Production) करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज व आपल्या प्लॉटची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

श्री. शिंदे म्हणाले, कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोगांची हमी देण्याकरिता हॉर्टनेटद्ववारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. २०२२-२३ करिता निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीकरिता युरोपियन युनियन व इतर देशांना देखील नोंदणी बंधनकारक करण्यात आलेले आहे.

तरी सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादन करणाऱ्या निर्यातदार शेतकऱ्यांनी सन २०२२-२३ च्या नोंदणी/नूतनीकरणकरिता कृषी विभागाच्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. त्वरित विहित नमुन्यातील अर्ज ७/१२ उतारा, ८ अ उतारा, बागेचा नकाशा व आवश्यक नोंदणी फी (फक्त द्राक्ष पिकासाठी) सह आपल्या प्लॉटची नोंदणी करावी, असेही ते म्हणाले.

द्राक्षवगळता अन्य पिकांसाठी नोंदणी शुल्क नाही

द्राक्षवगळता अन्य पिकांसाठी नोंदणी शुल्काची आवश्यकता नाही. नोंदणी करण्याची मुदत पुढीलप्रमाणे - ग्रेपनेट- द्राक्ष-ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२२- नोंदणी फी ५० रुपये प्रति १.२० हेक्टर क्षेत्राकरिता, द्राक्ष लेट फी- नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ - नोंदणी फी १०० रुपये प्रति १.२० हेक्टर क्षेत्राकरिता, मँगोनेट-आंबा-डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३, अनारनेट- डाळिंब-ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३, व्हेजनेट- भाजीपाला- वर्षभर सुरू.

परंतु काढणीच्या अगोदर १५ दिवस आवश्यक सीट्रसनेट /ओनियन नेट/ ऑदर फ्रूट नेट- लिंबुवर्गीय/कांदा/ केळी/व इतर फळपिके- वर्षभर सुरू परंतु काढणीच्या अगोदर १५ दिवस आवश्यक आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT