Koyna Dam agrowon
ताज्या बातम्या

Koyna Dam : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी, धरण इतके टक्के भरले

sandeep Shirguppe

Satara Rain News : सातारा जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. कोयना धरण परिसरातही पावसाने उघडीप दिल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी ३,३९१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा ८६.२६ टीएमसी झाला आहे.

कोयना विभागाच्या पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंचनासाठी सध्या धरण पायथा वीजगृहातील वीस मेगावॅट क्षमतेच्या एका जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे सिंचनासाठी कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १०५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

कोयना धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ३ हजार ३९९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे तर पूर्वेकडे सिंचनासाठी प्रतिसेकंद १०५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणाच्या जलाशयात पाणीसाठा ८६.२६ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ८१.२६ टीएमसी इतका आहे. तर जलपातळी ६५४.७६१ मीटर आहे. कोयना धरणाची १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.

यामुळे या धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी १८.९९ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, कृष्णा नदीपात्रातील कोल्हापूर बंधाऱ्यात व बॅरेजमध्ये आवश्यक पाणीसाठा झाला असल्याने कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून सुरू असलेला २१०० क्युसेक विसर्ग काल(ता.३१) सायंकाळी सहा वाजल्यापासून तो कमी करण्यात आला आहे.

सध्या १०५० क्युसेक करण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. कोयना विभागात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत.

या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. या धरणात सध्या १२१.६७ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर गतवर्षी या धरणात १४१.१९ टीएमसी पाणीसाठा झालेला. त्यावेळी पाऊस सुरुच असल्याने धरणांतून विसर्ग सुरू होता. तसेच ही धरणे ९५ टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT