Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

Dr. M.S. Swaminathan 100th Birth Anniversary: हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्य शासनाच्या वतीने ‘शाश्‍वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
Dr. M.S. Swaminathan
Dr. M.S. SwaminathanAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्य शासनाच्या वतीने ‘शाश्‍वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ७ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित हा उपक्रम हाती घेण्यात येणार असून यानिमित्त स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर-संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

यासंदर्भात कृषी विभागाने शासन आदेश जारी केला असून यंदापासून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारतीय हरितक्रांतीचे जनक असलेल्या डॉ. स्वामिनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता,उत्पादन वाढविण्यावर केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे देशात अन्न सुरक्षा बळकट झाली.

Dr. M.S. Swaminathan
Sustainable Agriculture Day: डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ७ ऑगस्ट ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार

शाश्वत शेती दिनानिमित्त स्थापन करण्यात येणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटरमध्ये कृषी विद्यापीठांनी शाश्वत शेती, हवामान अनुकूलन तंत्रज्ञान आणि अन्नसुरक्षा या वरील संशोधन करण्यात येणार आहे.

शाश्वत शेती दिन राज्य, जिल्हा, तालुका आणि विद्यापीठस्तरावर साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार असून इतर बाबींसंदर्भात कृषी आयुक्तलयाच्या वतीने शाश्वत शेती दिन साजरा करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com