sandeep Shirguppe
सध्या अनेक शेतकरी रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे वळत आहेत.
साताऱ्यातील शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याच्या देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवत क्रांती केली आहे.
शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करत गेल्या दोन वर्षात बाबर यांनी आपल्या माळराणात फुलवेला आंबा परेदशात निर्यात केला आहे.
शेती मालाला चांगला भाव मिळावा यासाठी बाबर यांनी सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी दीड एकरात दिडशे केशर, हापूस, गुलाल्या व रायवळ जातीच्या कलमी रोपांची लावगड केली.
यामध्ये केशर आंब्याची १२० झाडे आहेत. माण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून पाणी टंचाई या समस्येवर मात करुन सर्व झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत बाग फुलवली आहे.
सेंद्रीय शेतीसाठी त्यांना कृषि विभागाकडून विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन संच, गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.
दरम्यान बाबर यांच्या बागेत यंदाच्या हंगामात अधिक क्षमतेने फळाचा दर्जा वाढल्याने परदेशात विक्रीसाठी निर्यात करण्यास व्यापाऱ्यांनी बागेतच आंबा खरेदी करण्यास पसंती दिली.
यावर बाबर म्हणाले की, बाग लागवडीपासूनच रासायनिक खताचा वापर टाळला आहे. तसेच झाडावर किटक नाशकाचा वापर केला नाही.
झाडाच्या बुंध्या भोवती विविध कडधान्याबरोबरच देशी गायीच्या गोमुत्राची स्लरी जिवामृत वर्षातून तीन वेळा दिले.
सातारा जिल्हा परिषदेने घेऊन कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.