Ravikant tupkar Agrowon
ताज्या बातम्या

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रविकांत तुपकर नाराज ; कार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका जाहीर

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नाराज असून त्यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामुळे तुपकरांनी स्वाभिमानी संघटना सोडल्यास राजू शेट्टी यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Team Agrowon

Buldhana News : गेल्या काही महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आता उघडरीत्या समोर आली आहे. रविकांत तुपकर यांनी बुधवारी (ता. २) आपल्या समर्थकांची बैठक घेत त्यात ‘स्वाभिमानी’मधील काही वरिष्ठांवर थेट नाराजीचा सूर व्यक्त केला. त्यांच्या बोलण्याचा रोख स्पष्ट होता. राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरून आता तरुणांची फौज उभी करणार असल्याचेही त्यांनी समर्थकांसमोर जाहीर केले.

तुपकरांनी जिल्ह्यात, तसेच राज्यात सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत राजकारणाचा समाचार घेतला. संघटनेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यस्तरावरील काही नेते परस्पर पदांवरून काढून टाकत आहेत. याबाबत कुठलीही विचारणा आपणास होत नसल्याचे सांगत आपणही तुमच्या जिल्ह्यात येऊन असे करू शकतो. मात्र करणार नाही. स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी जिल्ह्यात आजवर तीन वेळा आले. मात्र आपणास दोन वेळा त्यांच्या दौऱ्याबाबत माहिती नव्हती, अशी खंत त्यांनी जाहीर बोलून दाखवली.

राज्यात संघटना वाढीसाठी वेळोवेळी प्रयत्न केले. लोक जोडले. त्यातील बरेच मोठेही झाले. मात्र आता दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आपल्यावर वार केला जात आहे. सोयाबीन, कापसाला भाव मिळवून दिला, शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत मिळवून दिली, पीकविमा मिळवून दिला ही चूक केली काय, असा प्रश्‍न केला. पण हेच कोणाला तरी खुपते आहे. माझ्याबाबत कोणी लावालावी करणार असेल, तर यापुढे ‘ईट का जबाब पत्थर’ने देऊ असा इशाराही दिला. ज्या जिल्ह्यात जाईन तेथे माणसे उभे करू शकतो. अनेक जिवाभावाची माणसे जोडली. त्यामुळे आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये, असा इशारा दिला. आजवर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत लढण्याची वारंवार तयारी केली. मात्र संघटना स्तरावर त्या त्या वेळी झालेल्या तडजोडीमुळे आम्हाला वेळोवेळी थांबवले. मात्र आता पुरे झाले, असे सांगत त्यांनी संघटनेतील विरोधकांना इशारा दिला.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आज तुपकरांच्या भाषणातून व्यक्त झाली. शेतकरी चळवळीत आजवर केलेला प्रवास थांबवायचा की चालू ठेवायचा, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर उपस्थित सर्वांनी हा लढा सुरू ठेवण्याबाबत घोषणा दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT