Chhatrapati Sambhajinagar News: ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘कृषी प्रदर्शना’चे शुक्रवारी (ता.९) मातीशी नाते जपणाऱ्या दोन प्रगतिशील शेतकरी दांपत्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभरातून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती..राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी दत्तू सखाराम धोत्रे, त्यांच्या पत्नी सौ. सखुबाई दत्तू धोत्रे (मु. पो. खिर्डी, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि रेशीमरत्न शहादेव किसनराव ढाकणे, त्यांच्या पत्नी सौ. शारदा शहादेव ढाकणे (मु. देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) या शेतकरी दांपत्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर हे प्रदर्शन भरले आहे..प्रदर्शनाचे सहप्रायोजक युनिटी एनर्जी प्रा.लि., महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), बी.जी. चितळे डेअरी, एक्सेल सोलार पॅावर, पितांबरी प्रॅाडक्ट्स अॅग्रीकेअर डिव्हिजन, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, आत्मा-कृषी विभाग हे असून, गिफ्ट पार्टनर रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) व हॉस्पिटल पार्टनर सी.एम.एस.एस. हॉस्पिटल हे आहेत. राज्य, परराज्य आणि विदेशातील उद्योगांचा सहभाग प्रदर्शनात असून, दररोज पेरणी यंत्र जिंकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणारआहे..Agrowon Agri Exhibition: ‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शना’ची जय्यत तयारी सुरू.शासनाच्या कृषी विभागासह कृषी संशोधन संस्था, बँका, कृषी शिक्षण संस्था, स्मार्ट सिंचन उपकरणांसह बियाणे, खते, कीटकनाशके, अद्ययावत कृषी उपकरणे, शेतीपूरक व्यवसाय, सोलर तंत्रज्ञान, कापणी यंत्रे, रोटाव्हेटर, मल्चर, ब्लोअर व्हिडरपासून ट्रॅक्टर, हार्वेस्टर आदी यंत्रे या ठिकाणी पाहायला उपलब्ध आहेतच..त्याशिवाय प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनाचे आधुनिक मॉडेल, तसेच दुग्ध व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान प्रदर्शनात आहे. ड्रोन फवारणीचे आधुनिक तंत्रज्ञान सांगणारे दालन सर्वांचे लक्ष वेधत आहे. जिल्हा कृषी विभागाचा धान्य महोत्सव आणि पूर्वा केमटेककडून वैशिष्ट्यपूर्ण बसवंत गाव ही दोन दालने शेतकऱ्यांचे आकर्षण ठरली आहेत. या प्रदर्शनात अडीचशेहून अधिक स्टॅाल्स आहेत. काल पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..Agri Exhibition 2026: प्रदर्शनात दररोज पेरणी यंत्र जिंकण्याची संधी .या सोहळ्याला ‘अॅग्रोवन’चे निवासी संपादक रमेश जाधव, ‘सकाळ’चे संपादक संतोष शाळिग्राम, ‘अॅग्रोवन’चे बिझनेस हेड बाळासाहेब खवले, युनिट हेड संजय चिकटे, कृषी विभागाचे सहसंचालक सुनील वानखेडे, राज्य बियाणे महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजाभाऊ मोराळे, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव, चितळे डेअरीचे संचालक गिरीष चितळे, युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे सूरज डिचकुले, एक्सेल सोलार पॉवरचे मार्केटिंग हेड अजित बिटके, रोहित कृषी इंडस्ट्रिजचे श्रीराम गोरे, ‘इफ्को’चे फिल्ड ऑफिसर कलीम शेख, सीएसएमएसएस हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र प्रधान, कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. .‘अॅग्रोवन’ हा शेतकऱ्यांचा सच्चा सोबती माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या हस्ते एवढ्या मोठ्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल, असे माझ्या ध्यानीमनीही नव्हते. ही अनपेक्षित संधी मिळाल्याने आम्ही पती-पत्नी भारावून गेलो आहोत. ‘अॅग्रोवन’ हा केवळ माहिती देणारा प्लॅटफॉर्म नसून तो शेतकऱ्यांचा सच्चा मित्र आहे, हे त्यांनी आज आम्हाला सन्मान देऊन कृतीतून सिद्ध केले आहे.शहादेव किसनराव ढाकणे (रेशीमरत्न शेतकरी, मु. देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर).माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत आम्हाला प्रदर्शनाचे सपत्नीक उद्घाटन करण्याचा बहुमान मिळाला. आजच्या या सन्मानाबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीत. ‘अॅग्रोवन’ नेहमीच शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती देत असतो. त्याच्या जोडीला प्रदर्शनासारखे उपक्रम आयोजित केल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला आहे.दत्तू सखाराम धोत्रे (शेतीनिष्ठ शेतकरी, मु.पो. खिर्डी, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.