Cotton Market: राज्यभर ‘सीसीआय’ कडून (भारतीय कापूस महामंडळ) हमीभावाने कापसाची खरेदी सुरू असतानाच आता खुल्या बाजारात कापसाच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता.९) कापसाचे सौदे ८००० ते ८४०५ रुपयांपर्यंत झाले.